श्री शारदा देवी नवरात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

श्री शारदा देवी नवरात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

१८ (टूडे २ साठी, महत्वाची)
(टिप ः जाहीरात आहे)


- rat१३p८.jpg-
२३M३७६५२
श्री शारदा देवी

- rat१३p९.jpg-
२३M३७६५३
तुरबंव येथील प्रसिध्द श्री शारदा देवीचे मंदिर

श्री शारदा देवी नवरात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा

तुरबंव येथील प्रसिध्द मंदिर ; जाकडी नृत्य प्रमुख आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील श्री शारदा देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारीपासून (ता. १५) प्रारंभ होत आहे. श्री शारदा देवीचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून या मंदिराचे बांधकाम दक्षिणात्य स्थापत्य कलेवर आधारित आहे. आधुनिक युगातील तरुणाई ही दांडिया, गरबा या सारख्या नृत्यकलेकडे आकर्षित झालेली असतानाही शतकापासून सुरू असलेले नवरात्रोत्सवातील या मंदिरांमधील जाकडी नृत्य हे भाविकांचे आणि अबाल वृद्धांचे प्रमुख आकर्षण आहे.
अश्विन शुक्ल प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत दहा दिवस देवीचा शारदोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो. या कालावधीत हजारोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येतात. अश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या रूपांच्या मूर्तींची व गौराई देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंदिरातील मूर्तींना वस्त्रालंकराने सजविण्यात येणार असून पुढील नऊ दिवस हा साज शृंगार तसाच ठेवला जातो. मंदिराला व परिसराला अत्यंत प्रेक्षणीय अशी विद्युत रोषणाई केली जाते व मंदिराचा गाभारा आणि अंतर्भाग विविधरंगी फुलांनी सजवतात. नवरात्रोत्सव काळात सकाळी आठ वाजल्यापासून देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी भाविकांची रीघ असते. हे दर्शन रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असते. रात्री नऊ वाजता देवीची महाआरती होते व त्यानंतर पारंपारिक जाकडी नृत्याला सुरुवात होते. धोतर नेसून त्यावर कमरेला शेला पायात घुंगरू व डोक्यावर पेशवाई पगडी घालून ढोल वाजंत्रीच्या तालावर केले जाणारे हे जाकडी नृत्य अत्यंत विलोभनीय असते व लोककलेचा एक वेगळा अविष्कार भाविकांना यावेळी पाहावयास मिळतो. रात्री ११:३० वाजता संतती विषयक नवस करणे व नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. दर्शन पहाटेपर्यंत चालू राहते. उत्सव काळात भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून श्री शारदा देवी मंदिर चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ अत्यंत तत्परतेने काम करतात. ‍भाविकांसाठी भक्त निवासात राहण्याची व्यवस्था आहे. या यात्रेची सांगता विजयादशमीच्या पहाटे होते. मंदिरासमोरील प्रांगणात सामुदायिक सोने लुटण्याचा (आपट्याची पाने प्रतिकात्मक) सोहळा होतो. दुसऱ्या दिवशी पहाटे देवीसमोर बांधलेले नवधान्य सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटून या उत्सवाची सांगता होते, असे तुरंबव येथील श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

भक्तांसाठी एसटी, रेल्वेची सुविधा
एसटी महामंडळातर्फे चिपळूण -तुरंबव,सावर्डे -तुरंबव अशा एसटी बसच्या विशेष फेऱ्‍यांचे नियोजन केले जाते. रेल्वेने येणाऱ्‍या भाविकांना चिपळूण किंवा सावर्डे स्थानकात उतरून तुरंबव येथे येता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com