रत्नागिरी-मैदानाप्रमाणे अन्य अनधिकृत बांधकामेही हटवा

रत्नागिरी-मैदानाप्रमाणे अन्य अनधिकृत बांधकामेही हटवा

rat13p16.jpg-
37694
रत्नागिरीः भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष राजेश सावंत. शेजारी दादा दळी, राजन फाळके, सतेज नलावडे, विवेक सुर्वे आदी.
---------
मैदानाप्रमाणे अन्य अनधिकृत बांधकामेही हटवा
राजेश सावंत ; पक्षाच्या झेंड्याचाही अवमान, माफी मागावी अन्यथा...

रत्नागिरी, ता. १३ : तहसीलदार म्हात्रे यांनी कुवारबाव येथील मैदानावर कारवाई करून ते उदध्वस्त केले. शासकीय जागेमध्ये हे मैदान होते. त्याचा वापर मुले खेळासाठी करीत होती. आम्ही ते मैदान वापरासाठी मिळावे, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी, तहसीलदार त्यासाठी सकारात्मक होते. परंतु शिंदे शिवसेनच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर दबावाखाली ही कारवाई केली. आमच्या पक्षाचा झेंड्याचाही त्यांनी मान ठेवला नाही. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी आणि जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही सक्षम आहोत, असा निर्वाणीचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला.
या मैदानावर जर कारवाई होत असेल, तर चंपक मैदानावरील गुरांची शेड आणि कुवारबाव येथील अनेक अनधिकृत बांधकामे हटवावी, अशीही मागणी त्यांनी केली. भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुकाध्यक्ष दादा दळी, सचिव सतेज नलावडे, डॉ. ऋषिकेश केळकर, राजन फाळके, विवेक सुर्वे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सुजाता साळवी, दादा ढेकणी आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, कुवारबाव येथे शासनाच्या रिकाम्या जागेत स्थानिकांच्या परवानगीने आणि श्रमदानातून हे मैदान बांधले होते. काही ठिकाणी ढासळण्याची शक्यता असल्याने ते बांधून घेण्यात आले. ग्रामपंचायतीसह गावातील चारशे लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन आम्ही एखाद्या संस्थेच्या नावे हे मैदान करून ते वापरात द्यावे, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत भेटलो होतो. स्थानिक लहान, मोठी मुले विविध खेळ येथे खेळणार होते. अनेक कार्यक्रम तेथे करता येतील. सर्वांसाठी ते खुले ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याला जिल्हाधिकारी, तहसीलदारांनीही सकारात्मकता दर्शविली होती. परंतु याबाबत शिंदे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत तक्रार केली. हे कोणाच्या खासगी जागेत नव्हेत, त्यामुळे त्यांचा तक्रार करण्याचा संबंध नव्हता. तरी त्याची दखल घेऊन सकारात्मक असलेल्या तहसीलदारांनी कारवाई केली. काही महिने ही कारवाई थांबली होती. आता अचाकन तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी जेसीबीने हे मैदान उदध्वस्त केले. हे करताना भाजपच्या झेंड्याचाही मान ठेवला नाही. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट आहे. संबंधितांने याबाबत तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही सक्षम आहोत.
शासकीय जागेत बांधलेले हे मैदान आम्ही अधिकृत आहे, असे म्हणतच नाही. परंतु आकसाने आणि दबावाखाली अशी कारवाई होणार असेल तर चंपक मैदानातील गुरांसाठी बांधलेली निवारा शेडही हटवावी. तसेच मैदानाच्या आजुबाजूला अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, ती तोडावी, अशी मागणी श्री. सावंत यांनी केली.

कोट
तहसीलदारांनी यापूर्वी मला वैयक्तीक नोटीस काढली होती. तेव्हा हे मैदान मी बांधले आहे, असे सिद्ध करा, असे सांगितले होते. परंतु त्यांना ते सिद्ध करता आले नाही, असा हा प्रशासनाचा कारभार आहे.
- सतेज नलावडे, भाजपचे सचिव, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com