एसटी आगाराला 1 कोटी 61 लाख उत्पन्न

एसटी आगाराला 1 कोटी 61 लाख उत्पन्न

७ (पान २ साठी)

एसटीचे चित्र वापरावे

खेड एसटी आगाराला कोटीचे उत्पन्न

बाप्पा पावला ; ३ लाख ९६ हजार प्रवाशांनी घेतला लाभ
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता.१३ : गणेशोत्सवात खेड एस.टी.आगारातून १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत १ कोटी ६१ लाख ७४ हजार ३३७ रूपयांची आर्थिक उलाढाल झाली. लांबपल्ल्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात धावलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्यांनी ७ लाख ९८ हजार १९४ किमीचा पल्ला गाठत ३ लाख ९६ हजार ६९० प्रवाशांची वाहतूक केली. यामध्ये दीड लाखाहून अधिक महिलांनी ''सन्मान'' योजनेचा लाभ मिळवल्याची माहिती एसटी आगार प्रशासनाकडून देण्यात आली.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणेसारख्या शहरातून चाकरमानी लाखोंच्या संख्येने तालुक्यात आले होते. त्यांच्या सुकर प्रवासासाठी आगारप्रमुख दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केलेले नियोजन व चालक-वाहकांनी मेहनत घेत विनाअपघात सेवा दिली. नियमित गाड्यांसह जादा गाड्यांची तसेच ग्रामीण बसफेऱ्यांची उपलब्धतता करून देवून गणेशभक्तांचा प्रवास सुखरूप झाला. विसर्जनानंतर परतीची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांची एसटी बसस्थानकात होणारी गर्दी व विलंबाने होणारे प्रवास टाळण्यासाठी प्रथमच महाडनाका येथील आगाराच्या गोळीबार मैदानातून आरक्षित केलेल्या जादा गाड्या सोडण्यात आल्या. गणेशोत्सव कालावधीत मुंबई, ठाणे,बोरिवली, भांडुप, नालासोपारा, पुणे आदी लांबपल्ल्यांच्या मार्गांवर दिवसाला नियमित धावणाऱ्या २६ गाड्यांच्या येवून जावून ३२ फेऱ्या होत होत्या. नियमित गाड्यांच्या फेन्यांनी ५ लाख ४८ हजार ९७८ कि.मी.चा पल्ला गाठत ३ लाख ८६ हजार ३६९ गणेशभक्तांना विनाअपघात प्रवास घडवला. यातून ८७ लाख ६९ हजार ९१७ रूपयांचे प्रवाशी वाहतूक उत्पन्न आगाराला प्राप्त झाले. महिला सन्मान, जेष्ठ नागरिक व अमृत जेष्ठ नागरिक योजनांचा गणेशोत्सव कालावधीत २ लाख २२ हजार ६०२ प्रवाशांनी लाभ मिळवला. यामध्ये १ लाख ६८ हजार ७८८ महिलाचा तसेच १८ हजार १४२ जेष्ठ नागरिकांचा तर ३५ हजार ६७२ अमृत जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

परतीसाठी २४६ बस आरक्षित
गौरी-गणेश विसर्जनानंतर परतीसाठी गणेशभक्तांनी बुकिंग केलेल्या २४६ आरक्षित गाड्या २३ ते २५ सप्टेंबर याकालावधीत गोळीबार मैदानातून सोडण्यात आल्या.


--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com