कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात गैरसोय

कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात गैरसोय

37746
कणकवली : येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय किर्लोस्कर यांना निवेदन देताना युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तेजस राणे व इतर. (छायाचित्र : अनिकेत उचले)

कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात गैरसोय

युवासेनेची खंत : दुर्लक्ष केल्यास आंदोलन अटळ

कणकवली, ता.१३ : येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयातील अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे रूग्‍णांची गैरसोय होत आहे. येत्‍या २६ ऑक्‍टोबर पर्यंत रूग्‍णांना चांगली सेवा न मिळाल्‍यास उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेना कणकवलीतर्फे आज देण्यात आला.
युवासेनेचे कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह तालुका समन्वयक तेजस राणे, प्रतीक रासम, रोहित राणे, प्रकाश सावंत आदींनी आज उपजिल्‍हा रूग्‍णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय किर्लोस्कर यांची भेट घेतली आणि निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, की उपजिल्हा रुग्णालयात सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रुग्णालयात ३० अधिपरीचारीका पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी ६ जणांची बदली झाली
असल्यामुळे कायमस्वरूपी १५अधिपरीचारीका आहेत. ज्याची बदली झाली आहे. त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी हजर झाले नाहीत. रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ व भुलतज्ज्ञ हे पद रिक्त आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या सर्जरी होऊ शकत नाही. गोरगरीब रूग्णाला खासगी रुग्णालयात जावे लागते. आस्थापना विभागामध्ये वरीष्ठ लिपिक हे पद व इतर पदे रिक्त झाली आहेत. त्याठिकाणी ८ पदे मंजूर असून ७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर अद्याप कोणतेही कर्मचारी दिले नाहीत. त्यामुळे आस्थापना विभागामध्ये गैरसोय आहे. तसेच रुग्णालयात विविध यंत्रणाही बंद आहेत. या सर्व यंत्रणा आणि पुरेसे डॉक्‍टर पंधरा दिवसांत न मिळाल्‍यास २६ ऑक्‍टोबरला धरणे आंदोलन केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com