रत्नेश्वर ग्रंथालयाकडून रुग्णवाहिका चालकांचा सन्मान

रत्नेश्वर ग्रंथालयाकडून रुग्णवाहिका चालकांचा सन्मान

११ (पान २ साठी)


-rat१३p२२.jpg-
P२३M३७७५१
रत्नागिरी ः श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या रुग्णवाहिका चालकांचा सन्मान करताना जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी. सोबत उमेश कुळकर्णी, अमर लोगडे आदी.
-------

रत्नेश्वर ग्रंथालयतर्फे रुग्णवाहिका चालकांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेचे नूतनीकरणानंतर पुन्हा लोकार्पण करण्यात आले. आतापर्यंत या रुग्णवाहिकेने ९ वर्षांत जवळपास ७०० रुग्णांचे प्राण वाचवले आहे. याकरिता पंचक्रोशीतील तरुण चालकांनी योगदान दिले आहे. यामुळे हे शक्य झाले. कोणत्याही संस्थेचा उपक्रम सातत्याने चालू ठेवण्याचे कठिण काम या ग्रंथालयाने केले आहे. याबद्दल रुग्णवाहिका चालकांचा सन्मान जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम नुकताच झाला. याप्रसंगी रुग्णवाहिका चालक विजय निवेंडकर, विनय पांचाळ, वैभव वारशे, किशोर पांचाळ, संजय गोनबरे, अनंत जाधव यांना पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच चालक आशुतोष रहाटे, विजय इरमल, महेश पांचाळ, निलेश पांचाळ, समीर पांचाळ, (कै.) सुधाकर रहाटे यांचेही आभार मानण्यात आले. नेवरे सरपंच दीपक फणसे, ओरी सरपंच संकेत देसाई, माजी सरपंच देसाई यांना सन्मानित केले. रुग्णवाहिकेसाठी २४ तासांत कधीही फोन येतो. पण त्याची योग्य माहिती घेऊन, संबंधित चालकांना विचारून व्यवस्था करावी लागते. तसेच कोणाचा फोन आला, रुग्ण व अन्य सर्व माहितीचे रजिस्टर तयार करणारे ग्रंथपाल केशव कुलकर्णी, लिपिक अविनाश लोगडे यांचाही सन्मान केला. माझी माती, माझा देश या अभियानाअंतर्गत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेतली होती. यामधील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावी गटामध्ये तन्मय भुवड, श्रावणी मांडवकर, अमिषा गोताड व विभूती लोगडे यांनी यश मिळवले. जि. प. केंद्रशाळा धामणसे क्र. १ या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटामध्ये स्नेहा पवार, शर्वरी पांचाळ, दिया शिंदे, सेजल रहाटे या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
--------
पोलिस चौकी सुरू करा

याप्रसंगी ओरी सरपंच संकेत देसाई यांनी तिवराड येथील पोलिस चौकी बंद असून ती चालू करण्याबाबत पोलिस अधीक्षकांना विनंती केली. तसेच धामणसे गावचे रिक्त पोलिस पाटील पद भरण्यासंदर्भातही विनंती अधीक्षकांना करण्यात आली. यावर लवकरच माहिती घेऊन निर्णय घेतो, असे पोलिस अधीक्षकांनी आश्वस्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com