''व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन'' पुस्तकाचे प्रकाशन

''व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन'' पुस्तकाचे प्रकाशन

rat13p1.jpg
M37643
रत्नागिरीः ‘व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन’ पुस्तकाचे प्रकाशन करताना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णीं. सोबत सचिन लिंगायत, सुकन्या ओळकर आदी.
--------
‘व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन’ पुस्तकाचे प्रकाशन
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णीं; बालविवाह मुक्त भारत मोहिम
रत्नागिरी, ता. १३ः भुवन रिभू यांच्या ‘व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन’ या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. बालविवाहामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यामधील नागरी समाज आणि महिलांच्या नेतृत्वाखालील बालविवाह मुक्त भारत मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात झालेल्या पुस्तक प्रकाशनावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव गोसावी आदि उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, देशभरात सुरू असलेल्या ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेदरम्यान, स्वयंसेवी संस्थेचे भुवन रिभू यांचे ‘व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन’ या पुस्तकाचे जिल्ह्यात वितरण करण्यात आले. हे पुस्तक महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी लढणारे भुवन रिभू यांनी लिहीले आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रखर वकील, महिला आणि मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओचे सल्लागार आहेत. बालविवाहामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ३०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नागरी समाज आणि महिलांच्या नेतृत्वाखालील बालविवाह मुक्त भारत मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव गोसावी आदी उपस्थित होते. तसेच दामले हायस्कूल मध्ये आंतराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये ६ ते ८ वी च्या मुलांना बालविवाहासंदर्भातील माहिती देण्यात आली. या प्रसंगी एनजीओ प्रमुख सचिन लिंगायत म्हणाले, "नागरिक समाज आणि सरकार काम करत आहेत. बालविवाहमुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करत आहेत. हे पुस्तक आम्हाला प्रेरणा देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com