शिक्षणक्षेत्रात एक निश्चित, दूरगामी धोरणं हवे

शिक्षणक्षेत्रात एक निश्चित, दूरगामी धोरणं हवे

१४ (पान २ साठी)

शिक्षणक्षेत्रात दूरगामी धोरणं हवे

अॅड. पाटणे ; शिक्षणाचा दर्जा खालावण्याची भिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४ हजार ७८३ शाळा बंद करून त्यांचे रूपांतर समूह शाळेत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सततच्या बदलत्या धोरणांमुळे शिक्षणक्षेत्रातील वातावरण अनिश्चित ठेवणे योग्य नाही. शिक्षणक्षेत्रात एक निश्चित दूरगामी धोरण हवे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले.

शासनाच्या निर्णयानुसार शाळा बंद होऊन २ किमीवरील शाळेत त्या विद्यार्थांना समायोजित करण्यात येणार आहे. बंद होणाऱ्‍या या शाळांत सरासरी प्रत्येकी दोन शिक्षक असून सरासरी १२ विद्यार्थी आहेत. यासंबंधी अॅड. पाटणे म्हणाले की, कोल्हापूर संस्थानात छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे व मोफत केले, हा आपला इतिहास आहे. शासनाच्या या निर्णयातून गरीब, वंचित, शेतकऱ्यांची मुले कायमची शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जातील. आधीच मुले २/४ किलोमीटर चालावे लागल्याने शाळेत दमून येतात. आधीच मुलींचे शिक्षणातून बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात अशा निर्णयामुळे अधिकच भर पडेल. समूह शाळा उभारण्याचा निर्णय, कंत्राटी शिक्षक भरती, शाळा दत्तक योजना असे नवनवीन प्रयोग चालू आहेत. यातून शिक्षणाच्या हक्काची पायमल्ली होईल.

राज्यात १४,७८३ शाळा बंद होणार असून रत्नागिरीतीली १८८ शाळांचा त्यात समावेश आहे. राज्यात १,८५००० विद्यार्थी व शिक्षक २९,७०७ यांचा समावेश आहे. आज शहरातील अनुदानीत शाळांत प्रत्येक वर्गात ४०-७० विद्यार्थी कोंबलेले असतात. खासगी शाळांमध्ये साधारण २०-५० विद्यार्थी असतात. खासगी क्लासेसमध्ये तर ८०-१०० विद्यार्थी कोंडवड्यासारखे कोंबलेले असतात. सरकारी शाळांमध्ये शिक्षण विनामूल्य मिळत असूनही पदरमोड करून खासगी शाळेत आपल्या पाल्यांना पाठविण्याची वेळ लाखो पालकांवर आली, याचा कोणीच विचार करीत नाही. सरकारी शाळांतील शिक्षणाचा दर्जा हा खासगी शाळांपेक्षा खालावला आहे, याची चिंता कोणीच करीत नाही, असे अॅड. पाटणे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com