संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

१३ (पान ५ साठी, संक्षिप्त)

नाना, किरण जोशी यांना
आज कीर्तनातून वाहणार श्रद्धांजली

रत्नागिरी : (कै.) ह. भ. प. महादेव उर्फ नाना जोशी बुवा व (कै.) हभप किरण जोशी बुवा यांचे अलिकडेच निधन झाले. त्यांना रत्नागिरीकरांच्या वतीने श्रद्धांजली सभा आणि कीर्तनाचे आयोजन केले आहे. उद्या (ता. १४) सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत बाजारपेठेतील श्री विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कीर्तनकार दत्तराज वाडदेकर बुवा (देवरुख) कीर्तन करणार आहेत. रत्नागिरीतील सर्व कीर्तनकार व प्रवचनकारांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या वेळी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
-------------

नागपूर -मडगाव जादा डबे

खेड ः कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी नागपूर- मडगाव एक कायमस्वरूपी १ वातानुकूलित व स्लिपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार नागपूर-मडगाव एक्सप्रेस १४ ऑक्टोबरला तर परतीच्या प्रवासात १५ ऑक्टोबरला १ अतिरिक्त वातानुकूलित स्लिपर डब्या जोडण्यात आला आहे.
-------

(टीप : जाहिरातदार आहेत.)
फोटो ओळी
- rat१३p१८.jpg-
२३M३७७०३
खेड ः शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे व महेंद्र भोसले यांना शुभेच्छा देताना खेड शहर शिवसेना पदाधिकारी.
----------
सचिन धाडवे, महेंद्र भोसलेंवर शुभेच्छांचा वर्षाव

खेड : शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे आणि संघटक महेंद्र भोसले यांचा वाढदिवस शिवसैनिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. भरणे येथील हॉटेल बिसू येथे आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. तालुकाप्रमुख सचिन धाडवे आणि संघटक महेंद्र भोसले यांना उपस्थित शिवसैनिक, महिला आघाडी आणि पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले. सुकीवली येथील सचिन धाडवे यांच्या निवासस्थानीदेखील अनेक नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार योगेश कदम यांनी तालुकाप्रमुख सचिन धाडवे व महेंद्र भोसले यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उद्योजक विलास बुटाला, अरुण कदम, शैलेश कदम, सतीश चिकणे, कौशल चिखले, अरविंद चव्हाण, सिकंदर जसनाईक, कुंदन सातपुते, आरपीआयचे कोकण संघटक सुशांत सकपाळ, सरचिटणीस सुरेंद्र तांबे, शांताराम चिनकटे, रामचंद्र आईनकर उपस्थित होते.

---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com