विजय चव्हाणांचे कार्य उल्लेखनीय

विजय चव्हाणांचे कार्य उल्लेखनीय

37801
कुडाळ ः पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ग्रामसेवक संघटना. बाजूला तहसीलदार अमोल पाठक, पोलिस निरीक्षक मुल्ला, दादा साईल आदी.

विजय चव्हाणांचे कार्य उल्लेखनीय

रूणाल मुल्ला ः कुडाळमध्ये वाढदिवस उपक्रमांनी

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः गटविकास अधिकारी विजय चव्हाण हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता इव्हेंट मॅनेजमेंटवर भर द्यावा. तुमचे कार्य वाखाखण्याजोगे असून मी आपल्याकडून भरपूर काही शिकले. तुमच्यामध्ये असलेले गुण माझ्या अंगी यावेत, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी केले. श्री. चव्हाण यांचा विविध विभागांच्यावतीने ५८ गुलाबांनी सजविलेला ५.८ किलोचा केक कापून वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.
येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चव्हाण यांच्या ५८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या विविध विभागाच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. हा सोहळा पंचायत समिती सभागृहात व महालक्ष्मी सभागृहात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध समाज संघटना मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. तहसीलदार अमोल पाठक, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, माजी सरपंच दादा साईल, सरपंच राजन परब, अजय आकेरकर, आर. डी. जंगले, संजय ओरोसकर, गणेश राठोड, एकात्मिक प्रकल्प अधिकारी गीता चेंदवणकर, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष सोनाली पालव, रांगणातुळसुळी माजी सरपंच नागेश आईर, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वासुदेव कसालकर, स्वप्ना मस्के, सरिता धामापूरकर, चेतना म्हाडगुत, बाळकृष्ण परब, के. टी. चव्हाण, सरपंच कावेरी चव्हाण, रामदास चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक श्रीमती मुल्ला यांनी सर्व क्षेत्रात विजय चव्हाण यांचा प्रचंड हातखंडा आहे. एवढ्या मोठ्या पदावर असताना कोणताही आव न आणता त्यांची सर्वसमावेशकता उल्लेखनीय आहे, असे सांगितले. श्री. साईल म्हणाले, ‘‘गटविकास अधिकारी चव्हाण यांनी तालुक्यात गेली सहा साडे सहा वर्षात सर्वागीण विकासाची घोडदौड कायम ठेवली आहे. माझ्या सरपंच कालावधीत आमच्यासाठी ते आयडॉल होते. त्यांनी कुडाळ तालुक्याला नेहमीच शासनाच्या सर्वच योजनांत राज्यपातळीवर अव्वल स्थानी नेले. ही त्यांची घोडदौड कोणी थांबवू शकला नाही. ते आता ३१ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. येथील पंचायत समितीच्या विकासात त्यांची पोकळी ही नेहमीच जाणवणार आहे. त्यांच्यासारखा विकासाचा महामंत्र घेऊन जाणारा गटविकास अधिकारी भविष्यात मिळणे कठीण आहे.’’ प्रफुल्ल वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सतीश साळगावकर, श्रीमती आडेलकर यांनी कविता सादर केली.
---------------
कोट
आज माझा वाढदिवस कुडाळ तालुक्याने दिमाखात साजरा केला. हा एक कौटुंबिक सोहळात होता. पंचायत समितीसह तालुक्यातील सर्व जनता माझे कुटुंब आहे. जरी निृवृत्त झालो तरी तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच सहकार्य राहिल.
- विजय चव्हाण, गटविकास अधिकारी, कुडाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com