विनापरवाना लाकूड वाहतूक;
आंबेगावातील एकावर गुन्हा

विनापरवाना लाकूड वाहतूक; आंबेगावातील एकावर गुन्हा

टीपः swt१३२२.jpg मध्ये फोटो आहे.
सावंतवाडी ः विनापरवाना लाकडासमवेत पकडलेल्या संशयितासमवेत वनविभागाचे अधिकारी.

विनापरवाना लाकूड वाहतूक
करणाऱ्यावर एकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः विनापरवाना जळाऊ लाकूड मालाची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप दळवी (रा. आंबेगाव), असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज बांदा-मडुरा रस्त्यावर करण्यात आली. टेम्पो, लाकूडसहित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बांदा-मडूरे रस्त्यापासून काही अंतरावर विनापरवाना जळाऊ लाकूड मालाची वाहतूक करीत असलेला टेम्पो (एमएच -०७-२२६१) पकडून वाहन चालक दळवी यांच्यावर विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा दाखल करून टेम्पो लाकूड मालासहित जप्त करण्यात आला. हे वाहन व लाकूड विठ्ठल सहदेव गावडे (रा.कुणकेरी) यांचे असल्याबाबत चौकशीत समोर आले आहे. ही कारवाई सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक आपासाहेब राठोड, संग्राम पाटील, सागर भोजने यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com