लांजा-कोंड्येतील बेपत्ता महिलेचा खून

लांजा-कोंड्येतील बेपत्ता महिलेचा खून

-rat१३p२६.jpg
37826
वैशाली रांबाडे

कोंड्येतील बेपत्ता महिलेचा
पैशाच्या वादातून खून

संशयिताला अटक; जुलैपासून होती गायब

लांजा, ता. १३ ः तालुक्यातील कोंडये-रांबाडेवाडी येथून बेपत्ता झालेल्या वैशाली चंद्रकांत रांबाडे यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. कोंड्ये येथीलच राजेंद्र गोविंद गुरव याने तिचा २९ जुलैला दुपारी कुवे येथील जंगलात खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संशयित राजेंद्र आणि वैशाली यांच्यात प्रेमसंबंध होते. वैशालीने वारंवार पैशाचा तगादा लावला होता. त्यातूनच हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडये-रांबाडेवाडी येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे (वय ४८) या २९ जुलै २०२३ ला आपण कुवे येथे डॉक्टरकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी परतली नाही. मुंबईहून पती चंद्रकांत रांबाडे हे गावी आल्यानंतर त्यांनी ३० जुलै रोजी लांजा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू होता. पती चंद्रकांत रांबाडे यांनी ११ रोजी राजेंद्र गुरव याने तिला फूस लावून पळून नेल्याची तक्रार लांजा पोलिसांत केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. राजेंद्र गुरवला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता संशयित राजेंद्र गुरवने वैशाली रांबाडेचा खून केल्याचे तपासात कबूल केले. कुवे येथील जंगल भागात आपण तिचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यानंतर शुक्रवारी (ता. १३) पोलिसांनी कुवे येथील जंगलात जाऊन तपास केला असता, वैशाली रांबाडे यांची ओळख पटेल असे अवशेष आणि काही वस्तू सापडल्या. नातेवाईकांनी मृतदेह तिचाच असल्याचे ओळखले. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी सांगितले. राजेंद्र गुरवने २९ जुलैला वैशालीला कुवे येथील जंगलात नेले. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर डोक्यात लाकडाने प्रहार करून तिचा खून केला.
पोलिसांनी राजेंद्र गुरव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेप्रकरणी आज जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com