सिंधुदुर्गात उद्यापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ

सिंधुदुर्गात उद्यापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ

सिंधुदुर्गात उद्यापासून
नवरात्रोत्सवास प्रारंभ

१२४ ठिकाणी दुर्गामाता प्रतिष्ठापना ः ३३ खासगी ठिकाणी प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः जिल्ह्यात गणेशोत्सवानंतर आता रविवारपासून (ता.१५) नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात १२४ ठिकाणी सार्वजनिक तर ३३ ठिकाणी खाजगी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक मंडळातर्फे जय्यत तयारी सुरु झाली आहे.
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली असून येत्या रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.
नवरात्री उत्सव धूम धडाक्यात व शांततेत पार पडावा. यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत. घटस्थापनेपासून विधिवत नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे, तसेच विविध मंदीरे तसेच खाजगी घरांमध्ये दुर्गा स्थापने निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर या उत्सवानिमित्त भजन, फुगड्या, रास दांडिया, नृत्य, रासक्रीडा, वेशभूषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सार्वजनिक दुर्गा मातेच्या स्थापनेसाठी सार्वजनिक मंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि दुर्गादेवीच्या स्थापनेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात १२४ ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
---------------
सार्वजनिक दुर्गादेवी
दोडामार्ग-११
बांदा-८
सावंतवाडी-१५
कुडाळ-१४
वेंगुर्ले-१०
निवती-५
सिंधुदुर्गनगरी-४
मालवण-१५
आचरा-४
देवगड-१०
विजयदुर्ग-६
कणकवली-१३
वैभववाडी-९
--------------
खासगी दुर्गादेवी
दोडामार्ग-२
वेंगुर्ले-४
कुडाळ-२
मालवण-९
विजयदुर्ग-१
सिंधुदुर्गनगरी-१
देवगड-८
सावंतवाडी-६
--------------
कोट
जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपासून सुरू होऊन नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याबाबत सर्व सार्वजानिक मंडळांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क केली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी नवरात्रोत्सव आनंदात व शांततेत साजरा करावा.
- संदीप भोसले, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com