कणकवलीतील फोंडाघाट पुलाचे 
राणेंच्या हस्ते भूमीपूजन

कणकवलीतील फोंडाघाट पुलाचे राणेंच्या हस्ते भूमीपूजन

Published on

कणकवली : फोंडाघाट येथे पुलाच्या कामाचा प्रारंभ करताना आमदार नितेश राणे. शेजारी संजय आग्रे, राजन चिके, मनोज रावराणे, बबन हळदिवे, सुजाता हळदिवे, संजना आग्रे आदी उपस्थित होते.

येथील फोंडेकरवाडी येथे नवीन पुलाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी १ कोटी १६ लाख ५३ हजार ६७५ रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल गावकऱ्यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांचे आभार मानले.

फोंडेकरवाडी येथील नाल्यावर पूल बांधकामाची मागणी गेली काही वर्षे होती. या मागणीकडे आमदार राणे यांनी लक्ष दिले. त्यामुळे पुलासाठी निधी मंजूर झाला. याचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी येथे झाले. यावेळी शिंदे गट शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे, भाजप किसान मोर्चा महाराष्ट्रचे सदस्य राजन चिके,

भाजपचे सरचिटणीस मनोज रावराणे, माजी सभापती बबन हळदीवे, सुजाता हळदिवे, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, सुरेश सामंत, भाई भालेकर, माजी सरपंच संतोष आग्रे, भाजप बूथ अध्यक्ष हेमंत फोंडेकर, सुनील लाड, एकनाथ काथरुड, नितीन पालकर, दीपक आरेकर, अमर फोंडेकर

अमित फोंडेकर, संजय फोंडेकर, प्रमोद फोंडेकर, सुहास लाड, संजय लाड, महेश सावंत, पुंडलिक आरेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत पारकर, सुभाष सावंत, विठ्ठल लाड, स्नेहलता पांचाळ, प्रज्ञा शिंदे, शक्ती प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.