स्त्री सन्मानाची कथा - सातबारा

स्त्री सन्मानाची कथा - सातबारा

rat3p3.jpg-
M48972
चिपळूणः राज्यनाट्य स्पर्धेत विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्था रत्नागिरीच्या सातबारा नाटकातील एक क्षण.
----------

चिपळूण राज्य नाट्य स्पर्धा---लोगो

स्त्री सन्मानाची कथा - सातबारा

अभय, सुयश आणि विश्वास या तीन मित्रांच्या जीवनावर आधारित सातबारा हे नाटक ६२ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेत येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावर रंगले. स्त्रीचा सन्मान करा, अन्यथा ही स्त्री तुम्हाला जिवंतपणे आणि मेल्यावरही सोडणार नाही, असा संदेश विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर विश्वस्त संस्था रत्नागिरीच्या सातबारा या नाटकातून देण्याचा प्रयत्न केला.

काय आहे नाटक

नीलेश जाधव लिखित सातबारा हे नाटक केवळ तीन पात्र असणारे तीन मित्रांच्या जीवनावर आधारित आहे. लहानपणापासून एकत्र असणारे मित्र हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकत्र येतात. तिघे मित्र कंपनी काढतात यातील अभय हा अनाथ असल्यामुळे त्याच्याकडे फार पैसे नसतात, मात्र यश आणि विश्वास त्याला मदत करतात. कंपनी सुरू होते. या कंपनीत बेरोजगार तरुण तरुणांना रोजगार देण्याचे कमिशन तत्त्वावरच काम सुरू असतं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे तीन मित्र विश्वासच्या एका मित्राच्या पत्नीची मैत्रीण वीणा ही नोकरीच्या शोधात असते, ती या तीन मित्रांच्या संपर्कात येते. वीणा दिसायला सुंदर, आकर्षक, राहणीमान अगदी श्रीमंतासारखं असल्यामुळे विणाला हे तिघेही नोकरीवर ठेवतात, परंतु तरुण असणारे अभय, सुयश आणि विश्वास हे वीणाकडे भोगाची वस्तू म्हणून पाहतात.
सुयश आणि विश्वास तर संधी साधून वीणावर बलात्कारही करतात. पण वीणाचे अभयवर प्रेम असते. मात्र अभयच्या मनात वीणाविषयी लग्नाबाबत काहीच भावना नसतात, तिचा उपभोग घ्यावा, असे अभयच्या मनात असतं. वीणा लग्न केल्यानंतर शरीरसुख मिळेल असे सांगते. पुढे तिची श्रीमंती पाहिल्यावर झटपट श्रीमंत होण्याची लालसा त्याला होते. तो तिच्याशी लग्न करतो. वर्ष दोन वर्षे चांगली जातात. इकडे कंपनीचे पैसे घेऊन अभय पळून जातो. काही दिवसानंतर हे पुन्हा भेटतात. वीणा आणि अभय यांच्यातील संबंध ताणले गेल्यामुळे अभय संधी साधून वीणाचा खून करतो. तिला बंगल्यातच पुरतो. तेव्हा सात वाजून बारा मिनिटे झालेली असतात. विणाचा आत्मा अभयने केलेला आपला खून, सुयश आणि विश्वास यांनी विश्वासघाताने केलेला बलात्काराच्या बदला घेण्याच्या प्रयत्नात असते.
सात वाजून बारा मिनिटांनी ती घरात येते. तिघा मित्रांना एकत्र आणते. तिघे मित्र गप्पा मारत असताना वीणा एकेकाच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि एकमेकांना संपवते. शेवटी अभय उरतो आणि अभय स्वतःला संपवतो. त्याचवेळी मागून आवाज येतो स्त्रीचा सन्मान करा, तुझ्याकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहू नका, अन्यथा ही स्त्री जिवंतपणे आणि मेल्यावरही त्याचा बदला घेणारच, असं सांगत या नाटकाच्या कथेला पूर्णविराम मिळतो. नाटकात केवळ तीनच पात्र आहेत. वीणा प्रेक्षकांसमोर कधीच येत नाही, वीणा समोर आली असती, तर नाटक अधिक खुलले असते. मात्र तीनही पात्रांनी भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. नेपथ्य, प्रकाश योजना या बाजू अतिशय उत्तमपणे सांभाळल्या गेल्या आहेत. संस्थेने केलेला प्रयत्न प्रयत्न कौतुकास्पद आहे.

* सूत्रधार आणि सहाय्य
दिग्दर्शक: अमित इंदुलकर. प्रकाश योजनाः संतोष नार्वेकर, नेपथ्यः अमित इंदुलकर, रंगभूषाः मयुरा जाधव, संगीतः केशव म्हात्रे, संगीत. संयोजनः स्वप्नील पर्वते. रंगमंच व्यवस्थाः वैभव जोशी, संकेत भुवड, प्रथमेश सावरकर, संकेत हळदे.

* पात्र परिचय
विश्वास: निलेश ठाकर, सुयश: सचिन नरे, अभय: निलेश जाधव

कोट
शाबासकी द्यायला हरकत
सात बारा हे नाटक गप्पांच... उगाच भांडायच आणि दारु पिण्यासाठी झाले, असे वाटत असले, तरीही तीनही कलाकारांचे पाठांतर मात्र चोख होते. म्युझिकच्या वेळी व्हिसलनी कंटाळा आला. अति गप्पांनी नाटक रेंगाळल, पण स्त्रियांचा सन्मान करावा हा विषय मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न टीमने केला. राज्य नाट्य स्पर्धेसाठी उतरण्याचे धाडस केलं आणि सादरीकरण केलं, यासाठी टीमला शाबासकी द्यायला हरकत नाही.
- मंगेश बापट, रंगकर्मी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com