सबज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा २१ रोजी डेरवणला

सबज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा २१ रोजी डेरवणला

२ (पान २ साठी)

ॲथलेटिक्स स्पर्धा २१ ला डेरवणला

जिल्हा असोसिएशन ;सबज्युनिअरासाठी नोंदणीची मुदत १९ पर्यंत

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने २१ जानेवारीला सबज्युनिअर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी तसेच आंतरजिल्हा राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डेरवण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे.
या स्पर्धेतून निवडण्यात येणारा रत्नागिरी जिल्ह्याचा सबज्युनिअर संघ ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे तर आंतरजिल्हा राष्ट्रीय स्पर्धा फेब्रुवारी तिसऱ्या आठवड्यात गुजरात येथे होणार आहे. ८ वर्षे वयोगटासाठी ५० मीटर, १०० मी., लांब उडी, थ्रो बॉल. १० वर्षे वयोगटासाठी ६० मी., १०० मी., लांब उडी, गोळाफेक तर १२ वर्षे वयोगटासाठी ६० मी., ३०० मी., लांब उडी, उंच उडी, गोळाफेक असे क्रीडाप्रकार मुले व मुलींसाठी असणार आहेत.
एक खेळाडू दोन क्रीडाप्रकारात सहभागी होऊ शकतो. आंतरजिल्हा राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा १४ व १६ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी आहे. जिल्हा स्पर्धेतून खेळाडू गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी युआयडी नंबर काढणे आवश्यक आहे. १४ वर्षे वयोगटातील खेळाडूंना ट्रायथलॉन ए गटातील ६० मी., लांब उडी, उंच उडी, ट्रायथलॉन बीमध्ये ६० मी., लांब उडी, गोळाफेक, ट्रायथलॉन सीमध्ये ६० मी., ६०० मी., लांब उडी असे क्रीडाप्रकार समाविष्ट आहेत. प्रत्येक खेळाडूंनी एका ग्रुपमधील तीन क्रीडाप्रकार करायचे आहेत. १६ वर्षे वयोगटातील ६० मी., ६०० मी., ६० मी. हर्डल्स, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक असे क्रीडाप्रकार आहेत. जिल्हा स्पर्धेसाठी प्रवेश नोंदवण्याची अंतिम मुदत १९ जानेवारीपर्यंत आहे. आपला प्रवेश ratnagiriathletics.in या रत्नागिरी जिल्ह्याच्या वेबसाईटवर निश्चित करायचा आहे. अधिक माहितीसाठी अजहर खलपे यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com