‘जनसेवा निधी’चे आज पुरस्कार वितरण

‘जनसेवा निधी’चे आज पुरस्कार वितरण

टीपः swt६१८.jpg मध्ये फोटो आहे.
वामन तर्पे, ज्ञानेश्वर हरमलकर, सदाशिव सावंत

‘जनसेवा निधी’चे आज पुरस्कार वितरण

बांद्यात रंगणार सोहळा ः गुणवंत विद्यार्थ्यांचाही होणार सन्मान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः येथील सेवाभावी (कै.) डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी बांदा संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या २०२३ साठीच्या पुरस्कारांचे वितरण उद्या (ता. ७) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, बांदा नं. १ येथे सायंकाळी ३.३० वाजता होणार आहे. यात आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद शाळा वेंगुर्ले नं. १ चे शिक्षक ज्ञानेश्वर हरमलकर, माध्यमिक विभागासाठी श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय, माणगाव प्रशाळेचे शिक्षक सदाशिव सावंत यांच्यासह इतर मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
(कै.) नारायण यशवंत तथा नाना तारी स्मृती समाजसेवक पुरस्कारासाठी प्रशांत भाट आणि अनाम परिवार यांची निवड झाली आहे. विविध शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा स्पर्धा यांमध्ये विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणारे ज्ञानेश्वर हरमलकर यांची उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे. विद्यार्थ्यांना शासकीय रेखा कला, स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन केल्याबाबत माध्यमिक शिक्षक सदाशिव सावंत यांची गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास सारस्वत कॉलेज म्हापसा-गोवाचे माजी प्राचार्य तथा गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी शालांत परीक्षा मार्च २०२३ मध्ये बांदा केंद्रातून इंग्रजी, विज्ञान व गणित विषयांत प्रथम आलेला निशांत नाईक, मराठी विषयात प्रथम आलेल्या हर्षिता धुरी व गौरी नाईक, बारावी परीक्षेत प्रथम आलेला शांताराम सावंत या गुणवंत विद्यार्थ्यांनाही रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जनसेवा निधी बांदाच्यावतीने डॉ. मिलिंद खानोलकर यांनी केले आहे.
..................
चौकट
मुख्याध्यापक तर्पे यांना ‘गुरुवर्य नाबर’
थोर शिक्षणतज्ज्ञ व आदर्श प्रशासक वि. न. तथा तात्यासाहेब नाबर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील स्मृती जपण्यासाठी एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना ‘गुरुवर्य नाबर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, विलवडे (ता. मालवण) प्रशालेचे मुख्याध्यापक वामन तर्पे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. गेली पंचवीस वर्षे ते मुलांसाठी व समाजासाठी उपक्रम राबवित मुख्याध्यापक पद भूषवित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com