जाहिरात लेख

जाहिरात लेख

२६ (जाहिरात पुरवणी लेख)


rat६p२३.jpg-
२४M५६२१४
रत्नागिरी ः मुलगी अपूर्वासह किरण उर्फ भैय्या सामंत.
rat६p२५.jpg-
२४M५६२१६
किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
rat६p२६.jpg-
P२४M५६२१७
शहरातील गवळीवाडा येथील व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन किरण सामंत यांनी सर्व्हिस करून केले.
----------------

जनतेच्या मनातील खासदार किरण सामंत

एखादा नेता राजकारणात मुख्यमंत्री, मंत्री, आमदार किंवा अगदी नगरसेवक नसून कोणत्याही पदावर काम करत नसताना त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असतो. गोरगरीब लोकं आपली दैनंदिन जीवनातील कामे त्यांच्याकडे घेऊन जातात. ते सुद्धा ती सर्व कामे अगदी लिलया करून देतात. किंबहुना त्या नेत्याच्या कर्तव्याचा हा भाग आहे, असे सर्वसामान्य जनता मानते. मग हे पद सोबत नसताना एखाद्या सामान्य व्यक्तीने जनतेशी अशाच पद्धतीने काम करून दाखवले तर व्यक्तीबद्दल सर्वसामान्य जनतेला नेहमीच आदर वाटेल. त्यासाठीच अशी व्यक्ती लोकांसाठी देवदूत असते. त्यांना राजकारणापलीकडे जाऊन मान आणि सन्मान मिळतो आणि राजकीय भाषेत अशा ताकदवान व्यक्तीसाठी सत्ताबाह्य केंद्र हा शब्द वापरला जातो. कोकणच्या राजकारणाचा विचार केला असता जिल्हा प्रशासनावर आपला प्रभाव असणारे सत्ताबाह्य केंद्र म्हणजे किरण उर्फ भैय्या सामंत हे आहेत. आता ते जनतेच्या मनातले खासदार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

--रमजान गोलंदाज

---

किरण सामंत यांचे वडील रवींद्र उर्फ अण्णा सामंत हे रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. भैय्याचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा अण्णांनी रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट घेण्याच्या व्यवसायात स्वतःचे प्रस्थ, वेगळे वलय निर्माण केले होते. त्यामुळे वडिलांचाच व्यवसाय पुढे घेऊन जात भैय्या सामंत आयुष्यात बक्कळ पैसे कमावू शकले असते. करिअरच्या सुरवातीच्या काळात वडिलांप्रमाणे रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट घेऊन भैयाशेठनी या परंपरागत व्यवसायाला आपला जमसुद्धा बसवला; पण ठेकेदारी करणे आणि अमाप पैसा कमावणे यासाठीच आपला जन्म नाही, या गोष्टीची त्यांना कुठेतरी जाणीव झाली. आयुष्यात कोणतीतरी वेगळी गोष्ट त्यांना खुणावत होती आणि ती गोष्ट म्हणजे रत्नागिरीचे राजकीय क्षितिज. त्यांच्याकडे पैसा, वडिलांची प्रतिष्ठा होती आणि मनमोकळा स्वभावदेखील होता. राजकारणात यशस्वी होण्यासाठी सर्व गोष्टी त्यांना अनुकूल असताना ते स्वतः राजकारणात प्रवेश करू शकले असते; परंतु त्यांनी राजकारणाच्या क्षितिजासाठी आपल्या लहान भावाची निवड
केली.
उदय सामंत हे तेव्हा ऐन तारुण्यात होते. या लाडक्या छोट्या भावाचे बोट धरून त्याला राजकारणाची पायरी चढायला शिकवणारे भैय्याशेठ होते. उदय आणि किरण ही सख्ख्या भावांची दोन वेगवेगळी नावे असली तरीही दोघांचा आत्मा आजही एकच आहे. एकमेकांशी इतकी एकरूप झालेली सख्ख्या भावांची जोडी आजच्या जमान्यात शोधूनसुद्धा सापडणार नाही.
राजकारणात पाहता उदय सामंत आमदार बनल्यानंतर किरण सामंतांमधील मुत्सद्दीपणाचा परिचय कोकणाच्या राजकारणाला आला. राजकारणातील कोणतेही पद न भूषवता भैयाशेठने रत्नागिरीचे सर्व राजकारण आपल्याच अवतीभोवती फिरवत ठेवले. त्यांच्या अचूक आणि बिनतोड रणनीतीतून उदय सामंत एकदा नव्हे, सलग चार वर्षे आमदार बनले. उदय आणि भैय्या या दोघांनीही आपल्या कामाची वाटणी उत्तमरित्या केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी उदय सामंत जेव्हा मंत्रालयात व्यस्त असतात तेव्हा इकडे मतदार संघात किरण सामंत जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत असतात. भैय्यांच्या कार्यालयात केव्हाही भेट दिली तरी त्यांच्या आसपास कार्यकर्त्यांच्या गराडा असतो आणि सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे आपली कामे हक्काने घेऊन आलेली दिसते. त्या कामाचा पाठपुरावा करून त्याला अंतिम स्वरूप देण्याची सर्व जबाबदारी भैय्या स्वतःकडे घेतात. मैत्रीच्या दुनियेतील दिलदार माणूस असून, भैय्याशेठ सर्वत्र परिचित आहेत. एखादी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्यानंतर भैय्यांशी नुसती ओळख कधी होते आणि त्या ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत कधी होते, हे दोघांनाही कळत नाही.
आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील लोकांच्या मनातील खासदार म्हणून भैय्या सामंत यांच्याकडे पाहिले जाते. जनसामान्य मतदार भैय्यांनी लोकसभा लढावी म्हणून आग्रह करत आहे. आज भैय्याची जागा हे त्यांचे कार्यालय नसून, दिल्लीचा दरबार भैय्याची वाट पाहत आहे. किरण सामंत हे रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गमधील जनतेच्या मनात घर करून आहेत. आज लोकप्रिय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. भैय्या हे जनसामान्यांचे नेते असून लोकाभिमुख काम करतील, अशी मतदारराजाला खात्री पटली आहे.

..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com