किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या

56262
सिंधुदुर्गनगरी : ‘सकाळ’चे नंदकुमार आयरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर. शेजारी इतर.


किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या

रवींद्र चव्हाण ः पत्रकार दिन कार्यक्रमात आवाहन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः टीका आणि टिकेला उत्तर एवढे मर्यादित न राहता पत्रकारांनी हात आणि हाताला काम मिळण्यासाठी लिखाण केले पाहिजे. जिल्ह्यातील ३६ किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम करायचे आहे. त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन घेऊन लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही. पत्रकारांनी एखाद दुसरा विषय निवडून त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक तथा जिल्ह्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गनगरी येथे उभारलेल्या पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम आज झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चव्हाण व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, आमदार वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, संघ सचिव देवयानी वरसकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माधव कदम, गणेश जेठे, संतोष वायंगणकर, नंदकिशोर महाजन, बाळ खडपकर, विद्याधर केनवडेकर, रमेश जोगळे, महेश सरनाईक, संतोष राऊळ, संतोष सावंत, महेश रावराणे, दाजी नाईक, संदीप देसाई, लखू खरवत, महेश रावराणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘इंग्रजांचे काम कसे चुकीचे आहे’ हे मांडण्याचे काम केले. हिंदू म्हणून त्यांनी त्याकाळात महत्त्वाची भूमिका घेतली होती. पत्रकारिता आरशाप्रमाणे पारदर्शक पाहिजे, याचा आदर्श त्यांनी घातला. पुरस्कार हा कार्यक्रम नसतो, तर ज्या क्षेत्रात काम करता, त्या क्षेत्रात चांगले काम करण्याची जाणीव करून देण्यासाठी तो दिला जातो. चुकीच्या घडत असलेल्या घटना नागरिकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. ‘टीआरपी’च्या खेळात न अडकता जबाबदारी समजून काम करा. देश महासत्ता बनण्याकडे जात असताना तरुणांनी काय केले पाहिजे, यांचे प्रबोधन पत्रकारितेतून झाले पाहिजे.’’ आमदार नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शुभम धुरी यांनी सूत्रसंचालन केले.
.................
चौकट
‘पत्रकारितेचा दर्जा कायम राखा’
बाळशास्त्री जांभेकर यांचे भवन उभारण्याचे स्वप्न साकार झाले आहे. हे भवन म्हणजे बाळशास्त्रींना खरी श्रद्धांजली आहे. त्यांचा जन्मगाव असलेल्या पोंभुर्लेला पुस्तकांचे गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता वेगळ्या उंचीची आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. या जिल्ह्याएवढे विकासाचे मार्ग अन्य जिल्ह्यांत नाहीत. पत्रकार भवनसाठी आवश्यक निधी संकलनासाठी सर्व योगदान दिले जाईल; मात्र पत्रकारांनी आपला दर्जा कमी करून घेऊ नये, असे आवाहन शिक्षणमंत्री केसरकर यांनी केले.
...................
चौकट
पुरस्कारांचे वितरण
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचा २०२३ चा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील चंद्रशेखर तांबट, ग्रामीण पत्रकार पुरस्कार मालवण-मसुरे येथील दत्तप्रसाद पेडणेकर, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडी येथील श्रीधर साळुंखे यांना, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरी येथील ‘सकाळ’चे प्रतिनिधी नंदकुमार आयरे, गणपत डांगी (दोडामार्ग), अवधूत पोईपकर (सावंतवाडी), प्रमोद म्हाडगुत (कुडाळ), प्रथमेश गुरव (वेंगुर्ले), दयानंद मांगलेंना (देवगड) सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com