जिल्ह्यात पक्ष संघटना भक्कम करा

जिल्ह्यात पक्ष संघटना भक्कम करा

56266
सावंतवाडी ः येथे आयोजित बैठकीस उपस्थित संदीप दळवी यांच्यासमवेत मनसे पदाधिकारी.

जिल्ह्यात पक्ष संघटना भक्कम करा

संदीप दळवी ः सावंतवाडीत मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारून पक्ष संघटना तळागाळांत पोहोचवा, असे आवाहन मनसेचे निरीक्षक संदीप दळवी यांनी आज येथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. दळवी यांच्या उपस्थितीत आज येथे आयोजित बैठकीत सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांतील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी दळवी यांनी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सनी बागकर, उपतालुकाध्यक्ष महादेव तांडेल, महिला तालुकाध्यक्ष स्नेहा कुडाळकर, वेंगुर्ले शहराध्यक्ष सूरज मालवणकर, सावंतवाडी उपतालुकाध्यक्ष राजेश मामलेकर व अतुल केसरकर, आंबोली विभाग अध्यक्ष काशिराम गावडे, बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर, मळेवाड विभाग अध्यक्ष अजित पोळजी, मळेवाड उपविभाग अध्यक्ष राकेश परब, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी यांचा समावेश आहे. सावंतवाडी विधानसभेची उर्वरित कार्यकारणी लवकरच जाहीर करणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी संपर्क अध्यक्ष अमित नाईक, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा सचिव बाळा पावसकर, उपजिल्हाअध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ विधानसभा सचिव सचिन सावंत, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, अभिमन्यू गावडे, सतीश आकेरकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, विजय बांदेकर, साहिल तळकटकर, पांडुरंग बुगडे, अमोल नाईक, मंदार चोपडेकर, सहदेव फोडनाईक, अनिकेत दळवी, हर्षद कांबळे, विशाल दळवी आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com