-रोकेगा कौन बॅनरने वेधले लक्ष

-रोकेगा कौन बॅनरने वेधले लक्ष

३२ (पान ३ साठी)

‘रोकेगा कौन’ फलकांनी वेधले लक्ष

किरण सामंत यांचा वाढदिवस ; शहरात नाक्यानाक्यावर बॅनरबाजी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ०६ : उद्योजक आणि सिंधुरत्न योजनेचे निमंत्रित किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमत्त शहरात जोरदार बॅनर बाजी करण्यात आली आहे. रोकेगा कौन... या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे किरण सामंत यांच्याकडे खासदारकीचे उमेदवार म्हणूनच कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे तसेच हॅप्पी स्ट्रीटसह अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
प्रसिद्ध उद्योजक आणि सिंधुरत्न योजनेचे निमंत्रित किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त रविवारी (ता. ७) सायंकाळी पाच वाजता माजी नगरसेवक निमेश नायर व त्याच्या मित्रमंडळीने रत्नागिरीकरांसाठी हॅप्पी स्ट्रीटची संकल्पना आणली आहे. या हॅपी स्ट्रीटवर मनोरंजन, खाऊ, गेम तसेच मज्जामस्ती खास लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. हॅपी स्ट्रीटसाठी लहान, मोठ्या सगळ्यांसाठी हे खुले व्यासपीठ ठेवण्यात आले आहे. कोणीही या व्यासपीठावर आपली कला सादर करू शकणार आहे. लहान मुलांसाठी पेंटिंग, सापशिडी गेम, लकी ड्रॉ यासारखे मजेशीर आणि मनोरंजनाचे खेळ असणार आहेत. हा कार्यक्रम एस. एस. मोबाईलच्या बाजूला होणार आहे. साळवी स्टॉप येथे माजी नगरसेवक रोशन फाळके यांनी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वाढदिवसानिमित्त शहरातील साळवी स्टॉप ते अगदी मिरकरवाड्यापर्यंत किरण सामंत यांना शुभेच्छा देणारे मोठे बॅनर लावण्यात आले आहे. प्रथमच त्यांनी आपण खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे किरण सामंत हे खासदारकीचे उमेदवार म्हणून शहरात वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com