रेखाकला परीक्षा यश

रेखाकला परीक्षा यश

रेखाकला, शिष्यवृत्ती परीक्षेत
एस. एम. हायस्कूलचे यश
कणकवली, ता. १२ : शासकीय रेखाकला परीक्षा, तसेच शिष्‍यवृत्ती परीक्षेत कणकवलीतील एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील प्रथम श्रेणीमध्ये पूर्वा सावंत, अनुष्का केतकर, किमया हिंदळेकर यांनी यश मिळविले. द्वितीय श्रेणीत १२ आणि तृतीय श्रेणीमध्ये ३४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत मयूर मेस्त्री, अनुश्री राणे, परिणीती तळेकर, चैताली राणे, तनिष्का गुरव, पीयूष वायकर, आदिती चिंदरकर, रत्‍नाली डिचोलकर यांनी यश मिळविले. द्वितीय श्रेणीमध्ये १७ तर तृतीय श्रेणीमध्ये ५२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
एमएनएस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रशालेच्या अकरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये प्रथम क्रमांक साहिल पवार, द्वितीय क्रमांक निशा राणे आणि तृतीय क्रमांक रिद्धी म्हपणकर यांनी प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष एस. एन. तायशेटे, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर, मुख्याध्यापक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आदींनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com