सिंधुदुर्गात आज जंतनाशक मोहीम ः डॉ. सई धुरी

सिंधुदुर्गात आज जंतनाशक मोहीम ः डॉ. सई धुरी

64557
डॉ. सई धुरी

सिंधुदुर्गात आज जंतनाशक मोहीम ः डॉ. सई धुरी

सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत उद्या (ता.१३) व २० ला जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. यात १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
जंतामुळे लहान मुलांमध्ये अनेक आजार डोके वर काढतात. त्यामुळे लहान मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी खाऊ देणे आवश्यक आहे. यासाठी शासनही आवश्यक ते प्रयत्न करत आहे. शासनाकडून वर्षभरात दोन वेळा जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात उद्या जंतनाशक गोळी वाटप केली जाणार असून जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. या दिवशी जी मुल गैरहजर राहणार त्यांना २० ला ही गोळी दिली जाणार असल्याची माहिती यावेळी डॉ. धुरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात ही पत्रकार परिषदेत पार पडली. यावेळी डॉ. रमेश कर्तस्कर उपस्थित होते. डॉ. धुरी पुढे म्हणाल्या, "जंतामुळे मुलांमध्ये अॅनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार मळमळ, भूक मंदावणे, आतड्यावर सूज येणे आदी आजार डोके वर काढतात. यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील प्रत्येकाला वर्षातून दोनवेळा जंतनाशक गोळी देण्याची मोहीम शासनामार्फत दोनवेळा राबविली जाते. यावर्षीची पहिल्या टप्प्यातील जंतनाशक गोळी वाटप मोहीम उद्या राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ एवढ्या मुलांना या गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. १ ते २ वयोगटातील मुलांना अर्धी गोळी पाण्यात विरगळुन, २ ते ३ वयोगटातील मुलांना १ गोळी पाण्यात विरघळुन तर ३ ते १९ वयोगटातील मुलांना पूर्ण गोळी चाउन खाण्यास दिली जाणार आहे. या जंतनाशक मोहिमेत एक ते सहा वर्ष वयोगटातील सर्व बालके, १ ते १२ वीतील, ६ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व शाळेत जाणारी मुले-मुली, ६ ते १९ वयोगटातील शाळेत न जाणारी मुले-मुली यांचा समावेश असून या सर्व मुलांना शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांच्या माध्यमातून (एलबे डेझॉल) जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com