

68758
कनेडी ः येथील बालमंदिर कनेडी शाळेच्या मुलांचे अभिनंदन करताना सुमंत दळवी आणि शिक्षकवर्ग.
कनेडी बालमंदिर शाळेचे
चिंथना स्पर्धेत नेत्रदीपक यश
कनेडी,ता. ३ ः येथील बालमंदिर कनेडी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चिंथना स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केले. चित्रदुर्गा कर्नाटका इंटरनॅशनल चिंथना अँड नवोदय कॉम्पिटिशन या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत बालमंदिर कनेडी या शाळेतील बालवाडी व इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे एकूण अठरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
या स्पर्धेत जिल्हास्तरावर सात विद्यार्थी यशस्वी झाले. चित्रकला परीक्षा- बालवाडी- श्रावी संदिप चांदोस्कर, गणित परीक्षा- बालवाडी-रिद्धी मंगेश सावंत, इयत्ता पहिली- दुर्वांक सिद्धेश राणे, सायन्स परीक्षा- इयत्ता तिसरी- आभास भिवा कोरडे, जनरल नॉलेज- इयत्ता पहिली- शिव कैलास सावंत, इंग्रजी ग्रामर- इयत्ता दुसरी- माही सतीश घाडीगांवकर, इयत्ता -चौथी गंधर्व जनार्दन जाधव या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, प्रशालेतील मार्गदर्शक सहाय्यक शिक्षिका रूबी घोन्सालवीस यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.