

rat3p3.jpg
68793
परटवणे येथील शौचालयाचा दरवाजाच मोडलेला आहे.
rat3p5.jpg
M68795
किल्ला येथील सार्वजनिक शौचालयासह परिसरातही अस्वच्छता आहे.
rat3p6.jpg
68796
मांडवी येथील समुद्र किनाऱ्यावरील शौचालयाची झालेली दुरावस्था.
rat3p8.jpg
M68798
शहरातील पालिकेचे रामआळी येथील सुलभ शौचालयावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.
----------
शहरातील सुलभ शौचालयांची दुरवस्था
रत्नागिरीतील स्थिती ; कुठे दरवाजे नाहीत, कुठे कचऱ्याचे साम्राज्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः शहरातील परिसरात पालिकेच्या माध्यमातून ठिक-ठिकाणी शौचालये उभी केली आहे. ज्या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद कमी आहे, अशा ठिकाणच्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य तर शौचालयात अंतर्गत अस्वच्छता आहे. काही शौचालयाना दरवाजेच नाहीत. स्वच्छताच केलेली नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे शहरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न देखिल जटील झाला आहे.
रत्नागिरी शहरात पालिकेकडून रामआळी, लक्ष्मीचौक, परटवणे सरोदेवाडी, घुडेवठार येथील नित्याची वापरात येणाऱ्या सुलभ शौचालयांची दुरुस्ती अथवा स्वच्छता बऱ्यापैकी आहे. मात्र परटवणे, किल्ला, मांडवी या ठिकाणच्या शौचालयासमोर जाण्यासही नागरिक धजावत नाही. त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे भविष्यात नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. परिसरातील काही ठिकाणच्या सुलभ शौचालयाकडे कुणी ढुंकूनही पहात नाहीत. पालिकेकडून या शौचालयाची दुरुस्ती अथवा स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. घुडेवठार, खडपेवठार या ठिकाणच्या शौचालयाची पालिका कर्मचारी काम करत होते. ज्या ठिकाणी शौचालयांना दरवाजाही नाही, तेथे पालिकेने याकडे लक्ष देऊन सुलभ शौचालयांची काळजी व दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट
शहरातील शौचालयाची परिस्थिती गंभीर आहे. व्यवस्थित साफसफाई नाही. मारूतीमंदिर येथील एका शौचालयात बेसीनला नळ नाही, काही ठिकाणी पाणी नसते. ही पूर्ण नगरपालिकेची जबाबदारी आहे. याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
- हारिस शेकासन, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.