

राज्य सरकारच्या आश्वासनानंतर
आशा, गटप्रवर्तकांचा संप स्थगित
रत्नागिरी, ता. ३ ः आशा व गटप्रवर्तकांनी पुकारलेला १२ जानेवारीपासूनचा संप अखेर शनिवारी (ता. २) स्थगित करण्यात आला. शासनाने ठोस असा निर्णय दिला नसला तरी, आश्वासन दिले असून त्याच्यावर विश्वास ठेवूनच हा संप स्थगित केल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
आपल्या न्याय मागण्यांसाठी गेले अनेक वर्षे आशा स्वयंसेविका झटत आहेत, अनेकवेळा आंदोलने, बेमुदत संप करुनसुद्धा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यातील ७६ हजार आशा व गटप्रर्तक महिलांनी १२ जानेवारीपासून बेमुदत संपाला सुरुवात केली होती. संपाबरोबरच अनेक राज्यामधील जिल्ह्यामध्ये आणि मुंबई आझाद मैदान मध्ये प्रचंड निदर्शने आंदोलनेही झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी ठाण्यामध्ये तीस हजार महिलांनी जाऊन मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. १ ऑक्टोबर २०२३ रोजी बेमुदत संपाची नोटीस दिल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या मंजूर केलेल्या नाहीत.
इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व दोन हजार रुपये भाऊबीज आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ देण्याबद्दल निर्णय दिला. परंतु त्याची अंमलबजावणी तर शासनाने केलीच नाही. उलट आशा व गटप्रवर्तक महिलांना मानधनवाढ निर्णय घेण्याचा आरोग्यमंत्र्यांना अधिकारच नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारे मंजूर केलेल्या मागण्या महाराष्ट्र शासन उधळत आहे, असा आरोप आयटक फेडरेशनने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. या संदर्भात बेमुदत संप करुनही शासन दुर्लक्ष करत आहे. शेवटी हा संप स्थगित करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारपासून सर्व आशा कामावर रुजू झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.