

पान ५
फुपेरेत ८ मार्चला महाशिवरात्र उत्सव
राजापूर : तालुक्यातील फुपेरे येथील भोवडवाडी विकास मंडळाच्या वतीने भोवडवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शुक्रवारी (ता. ८) महाशिवरात्री उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वा. पूजा, आरती, तीर्थप्रसाद, हळदी-कुंकू, सायंकाळी ७ ते ९.३० वा. स्थानिक भजने, रात्री १० वा. ट्वेंटी ट्वेंटी भजनाचा जंगी सामना होणार आहे. भाविकानी उपस्थित राहावे, असे आवाहन भोवडवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोवड, सचिव रवींद्र भोवड, खजिनदार चंद्रकांत भोवड आदींनी केले आहे.
एम. बी. साखळकरांसाठी उद्या शोकसभा
राजापूर : तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक एम. बी. साखळकर यांच्या निधनानिमित्त त्यांची शोकसभा मंगळवारी (ता. ५) सकाळी १० वा. वडवली हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शरद साखळकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.