मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुजा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते  पुजा
Published on

rat3p34.jpg-
68860
गणपतीपुळे : येथील श्रींच्या मंदिरात रविवारी पूजा, अभिषेक करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
(छायाचित्र- वैभव घाग.)
------------
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या
हस्ते गणपतीपुळ्यात श्रींची पूजा
रत्नागिरी, ता. ३ः गोव्याचे मुख्यमंत्री, भाजपचे कोकण क्लस्टर प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सकाळी गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात पूजा केली. पुन्हा एकदा मोदी सरकार येऊ आणि महाराष्ट्र, गोवा, भारत देशातील जनता सुखी समाधानी होऊ दे, भारत महासत्ता होऊ दे यासाठी त्यांनी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.
भाजप युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर, मुख्य पुजारी व डॉ. चैतन्य घनवटकर यांनी पौरोहित्य केले. पुजेनंतर दिवार लेखन अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, लोकसभा सहप्रभारी व रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने प्रमुख उपस्थित होते. डॉ. सावंत यांचा गणपतीपुळे दौरा यशस्वी करण्यासाठी अभिजीत घनवटकर आणि मुख्य पुजारी डॉ. चैतन्य घनवटकर, अवधूत केळकर, राज देवरुखकर यांनी मेहनत घेतली.
यानिमित्त गणपतीपुळे येथील वातावरण भाजपमय झाले होते. मंगलमूर्ती मोरया, फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार ४०० पार, भारतमाता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर या वेळी दुमदुमून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com