‘नाथ सेवा उत्सव’ला बांद्यात उत्साहात प्रारंभ

‘नाथ सेवा उत्सव’ला
बांद्यात उत्साहात प्रारंभ
Published on

68871
बांदा ः संत सोहिरोबानाथ आंबिये मठात माध्यान्ह आरती करताना भाविक.

‘नाथ सेवा उत्सव’ला
बांद्यात उत्साहात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः येथील संत सोहिरोबानाथ आंबिये मठामध्ये गुरुप्रतिपदेपासून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात ‘नाथ सेवा उत्सवाचा’ आरंभ झाला आहे. नाथभक्त भाविकांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. भाविकांनी मोठ्या संखेने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षी गुरुप्रतिपदेला नाथांच्या जयंतीपासून त्यांचा सदेह निर्वाण दिन असलेल्या श्रीरामनवमीपर्यंत मठात ‘नाथ सेवा उत्सव’ सुरू असतो. या उत्सवकाळात मठात नित्य मंगळवारची भजन सेवा व गुरुवारची माध्यान्ह आरती यांच्यासह दर मंगळवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्रीराम नामाचा जप होणार आहे. दर गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ महिला भजनकर्मींची भजनसेवा होणार आहे. नाथभक्त भाविक, सेवेकरी सर्वांनी या सेवेत सहभागी होऊन या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ सेवेकरी भक्त परिवारातर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

pandharpur palakhi marg
NARAYANI SHASTRI ON ALOK NATH
Banda Shaktipeeth Highway Protest
Jalna
Marathi News Esakal
www.esakal.com