शिक्षण खासगीकरणाविरोधात संघटित व्हा

शिक्षण खासगीकरणाविरोधात संघटित व्हा
Published on

68923
रत्नागिरी ः येथील कास्ट्राईब शिक्षक संघटना मेळाव्यात आकाश तांबे यांचे स्वागत करण्यात आले.

शिक्षण खासगीकरणाविरोधात संघटित व्हा

आकाश तांबे ः रत्नागिरीत ‘कास्ट्राईब’ संघटनेचा स्नेहमेळावा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले महिला राज्य अधिवेशन महिलादिनी शुक्रवारी (ता. ८) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव (जि. सातारा) येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य अध्यक्ष आकाश तांबे यांनी रत्नागिरी येथे केली. रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिक्षणाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असून, शिक्षकांनी वेळीच संघटित झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
तांबे यांनी यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची भूमिका, कार्यपद्धती व राज्यातील शिक्षकांच्या समस्या मांडल्या. भविष्यात शिक्षणाचे पूर्णतः खासगीकरण होणार आहे. खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल असल्याने शिक्षकांनी जागृत राहिले पाहिजे, संघटित असले पाहिजे आणि शिक्षण चळवळीचा भाग बनले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष संजय कुर्डूकर, पी. डी. सरनाईक, सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रदीप पवार, चिटणीस प्रशांत जाधव, एस. टी. सेल प्रमुख कुणाल तडवी, अतिरिक्त सरचिटणीस प्रमोद गमरे, उपाध्यक्ष दिलीप तांबे, संदीप थोरवडे, संघटक प्रल्हाद सरगर, तालुका सरचिटणीस अनिल चव्हाण, बिपीन मोहिते, हिरालाल चावरे, तालुका उपाध्यक्ष उमेश तायडे, मंडणगड तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, चिपळूण तालुकाध्यक्ष देविदास शिंदे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष युवराज कांबळे, गुहागर सचिव राजेश गायकवाड, किशोर धुत्रे आदी पदाधिकारी सभासद उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक उपक्रमशील महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिकांना माता सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार, गुणवंतांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रदीप वाघोदे यांनी केले. अनिल चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com