Kokan News: बिबट्याच्या दहशतीने नाणोसवासीय त्रस्त; वनविभागाचे वेधले लक्ष

बिबटा हा रात्रीच्या भरवस्तीत भक्ष्याच्या शोधात फिरत असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याबाबत मागणी केलेली आहे.
Kokan News
Kokan Newssakal

Kokan Forest News: नाणोस गावातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा, असे लेखी निवेदन नाणोस सरपंच प्राजक्ता शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद ठाकूर, वासुदेव जोशी, बाबल ठाकूर, उमेश शेट्ये व गुळदुवे उपसरपंच यांच्यावतीने सावंतवाडी उपवनसंरक्षक यांना देण्यात आले.

Kokan News
Kokan Railway: कोकणात होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या!

दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाणोस गावात सायंकाळ झाल्यानंतर लोकवस्तीतील घराशेजारी बिबट्याचा ओरडण्याचा आवाज येतो. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत असून काजू हंगाम सुरु असल्याने रानात जाण्यास भिती निर्माण झालेली आहे. बिबटा हा रात्रीच्या भरवस्तीत भक्ष्याच्या शोधात फिरत असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ग्रामसभेत ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याबाबत मागणी केलेली आहे.

Kokan News
Kokan News: ''संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हटवले पाहिजे''

तरी भरवस्तीत मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्याची गांभिर्याने दखल घेऊन त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर येत्या दोन दिवसांत पिंजरा लावू, असे आश्वासन वनधिकारी श्री. गाड यांनी दिले. उपवनसंरक्षक कार्यालय सावंतवाडी येथे सरपंच ग्रामपंचायत नाणोस व ग्रामस्थ यांनी श्री. गाड यांची भेट घेऊन निवेदन देऊन याबाबत चर्चा करण्यात आली.

त्या चर्चेत दिलेल्या आश्वासनानुसार निवेदनची तत्काळ दखल घेत घटनास्थळी वन परिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, संग्राम पाटील, वनरक्षक अप्पासो राठोड यांनी नाणोस गावाला भेट देऊन एक तासभर पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य श्रीपाद ठाकुर उपस्थित होते.

Kokan News
Kokan Railway : कोकण रेल्वेने गेल्या तीन महिन्यात ५ कोटी ६० लाख ९९ हजार रुपयांचा केला दंड वसूल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com