महिलांनो, प्रत्येक गोष्टीत सतर्क राहा

महिलांनो, प्रत्येक गोष्टीत सतर्क राहा

70211
नडगिवे ः ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्रावणी मदभावे. व्यासपीठावर सतीश मदभावे, संतोष नाईक, सरपंचमाधवी मण्यार आदी.


महिलांनो, प्रत्येक गोष्टीत सतर्क राहा

श्रावणी मदभावे ः नडगिवेत ‘सायबर सुरक्षा’ विषयावर प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० : महिलांनी आज प्रत्येक गोष्टीत सजग आणि सतर्क राहिले पाहिजे. त्यासाठी आपली विचारांची कवाडे नेहमीच उघडी ठेवावी लागतील. प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार जीवनात वेगळा ठसा उमटविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गरज ओळखून योग्य पर्याय निवडल्यास महिला निश्चित स्वयंपूर्ण होतील, असे प्रतिपादन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या कणकवली तालुका महिला संघटक व येथील श्रावणी कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका श्रावणी मदभावे यांनी केले.
नडगीवे ग्रामपंचायत आणि ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तसेच प्रज्ञांगण परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नडगिवे प्रशालेमध्ये करण्यात आले. यावेळी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर मदभावे बोलत होत्या. यावळी प्रज्ञांगण परिवाराचे संचालक सतीश मदभावे, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी विशेष मार्गदर्शन केले. नडगिवे सरपंच माधवी मण्यार, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर आदी उपस्थित होते.
सतीश मदभावे यांनी उपस्थित महिलांना सायबर सुरक्षिततेसाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी व स्मार्ट फोनमधून होणारी आर्थिक फसवणूक याबाबत उद्बोधन केले. मोबाईलचे विद्यार्थ्यांवर होणारे घातक दुष्परिणाम याविषयीची अनेक उदाहरणे देऊन सायबर गुन्हेगारीचे प्रकार किती घातक आहेत, हे समजावून दिले. यासाठी महिला, पालक व मुलांनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. संतोष नाईक यांनी सायबर गुन्हेगारी कशी घातक आहे, त्याविषयी काही उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिला मेळाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले. सरपंच मण्यार यांनी मान्यवरांचा सन्मान केला. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक संदीप कदम यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com