झारापमध्ये महिलांना कायदेविषयक धडे

झारापमध्ये महिलांना कायदेविषयक धडे

70214
झाराप ः पैठणी स्पर्धेत विजेत्या सिद्धी आवळेगावकर यांना गौरविताना रुपाली प्रभू.


झारापमध्ये महिलांना कायदेविषयक धडे

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग अभय केंद्र व समुपदेशन केंद्र कुडाळतर्फे झाराप ग्रामपंचायत येथे महिला दिनानिमित्त महिलांसाठी कायदेविषयक, वैद्यकीय व औद्योगिक विकास यावर मार्गदर्शन करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.
पैठणीच्या खेळास महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या पैठणीचा मान सिद्धी आवळेगावकर यांना मिळाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. हर्षदा देवधर उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. झाराप सरपंच दक्षता मेस्त्री व इतर सदस्यांसह सखी वन स्टॉप सेंटर प्रभारी केंद्र प्रशासक रुपाली प्रभू व केस वर्कर मीनाक्षी नाईक व अभय केंद्र कुडाळचे सहाय्यक संरक्षण अधिकारी अक्षय कानविंदे, समुपदेशन केंद्राचे समुपदेशक महेंद्र जाधव, समृद्धी मळेकर, गौरी पावसकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com