रेडी परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील

रेडी परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील

70264
रेडी ः येथील श्री देवी माऊली मंदिर अन्नछत्र, सभागृह व भक्तनिवास इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित निलेश राणे, राजन तेली, प्रभाकर सावंत, प्रितेश राऊळ, रामसिंग राणे व इतर मान्यवर.

रेडी परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील

नीलेश राणे ः माऊली मंदिराच्या विविध विकासकामांना प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः रेडी येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिराच्या विविध विकास कामांचा शुभारंभ होत असताना या धार्मिक स्थळाला अजूनही मोठे नावलौकिक प्राप्त होणार आहे. रेडी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी केले.
तालुक्यातील रेडी येथील सुमारे ५ कोटी रुपयांच्या श्री देवी माऊली मंदिर अन्नछत्र सभागृह, भक्तनिवास इमारत व मंदीर परिसर सुशोभिकरण या कामाचा भूमिपूजन समारंभ आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या ऑनलाईन उपस्थितीत व श्री. राणे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, श्री देवी माऊली देवस्थान विश्वस्त संदीप राणे, भानुदास राणे, प्रकाश कामत, सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, आर्किटेक्चर नंदन सावंत, सार्वजनिक बांधकाम अभियंता भगत, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, भूषण सारंग, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, रेडी ग्रामपंचायत सदस्य, भाजप पदाधिकारी व रेडी ग्रामस्थ उपस्थित होते. या मंदिर विकास कामासाठी गावातील सर्व ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा निधी देता आला याबद्दल मी भाग्यवान समजतो, असे पालकमंत्री चव्हाण यावेळी म्हणाले. श्री. तेली म्हणाले, ‘‘रेडी येथील माऊली देवस्थानच्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामानंतर हे स्थळ एक मोठं धार्मिक स्थळ म्हणून अजून प्रसिद्ध होणार आहे. हा विकासाचा रथ भाजपाच्या माध्यमातून असाच पुढे-पुढे जाण्यासाठी सर्वांनी सोबत रहा.’’ यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सावंत, श्री. राऊळ यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच राणे यांनी करत सर्वांचे आभार मानले.
----------------
मंत्री राणेंमुळे अनेक कामे मार्गी
श्री. राणे म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रेडी गावावर विशेष प्रेम आहे. आजपर्यंत त्यांच्या माध्यमातूनही अनेक कामे मार्गी लागली आहेत. आता पालकमंत्री चव्हाण यांनीही या नूतन कामाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. भाजपच्या माध्यमातून रेडी गाव विकासाच्या पटलावर घेण्यासाठी येथील माजी सभापती प्रितेश राऊळ आणि सरपंच रामसिंग राणे हे दोघे अतिशय मेहनत घेत आहेत. रेडीवासीयांनी प्रत्येक वेळी साथ देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. कारण विकासकामे मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करणे सोपे नसते. त्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो. या दोघांच्या कामाबद्दल खरोखरच कौतुक आहे. रेडीवासीयांनी भाजपच्या माध्यमातून होत असलेल्या या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना साथ द्यावी.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com