टुडे पान एक संक्षिप्त-कासार्डे येथे २८ ला
रस्सीखेच, समूहनृत्य

टुडे पान एक संक्षिप्त-कासार्डे येथे २८ ला रस्सीखेच, समूहनृत्य

टुडे पान एक संक्षिप्त

कासार्डे येथे २८ ला
रस्सीखेच, समूहनृत्य
तळेरे ः कासार्डे येथील राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरुण उत्कर्ष मंडळाच्या वतीने शिवजयंती (तिथीनुसार) निमित्त गुरुवारी (ता. २८) खुला गट समूहनृत्य स्पर्धा, कासार्डे गाववाडी मर्यादित रस्सीखेच स्पर्धा व जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे.
खुला गट समूहनृत्य स्पर्धा शाळा, महाविद्यालय ग्रुप यांच्यासाठी असून प्रथम दहा हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय पाच हजार व सन्मानचिन्ह, तृतीय तीन हजार व सन्मानचिन्ह व सहभागी प्रत्येक संघास मानधन व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. समूहनृत्य स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर लोककला नृत्य प्रकार असणे गरजेचे आहे. ही स्पर्धा २८ ला सकाळी १० वाजता होईल. सायंकाळी ६ वाजता कासार्डे गाववाडी मर्यादित रस्सीखेच स्पर्धा होणार असून यासाठी प्रथम तीन हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय दोन हजार व सन्मानचिन्ह तर रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेसाठी प्रथम पाच हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय तीन हजार व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे आहेत. संघात आठ खेळाडू सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी सहदेव ऊर्फ आण्णा खाडये, रमेश मुणगेकर, गुरूप्रसाद सावंत, किरण मुणगेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

तळवडे येथे उद्या
आरोग्य शिबिर
सावंतवाडी ः अथायु मल्‍टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व डॉ. सौ. अफशान कौरी व ओंमकार वसंत पडते यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. १२) सकाळी १० ते २ या वेळेत तळवडे येथे सिद्धरामेश्वर कॉप्लेक्स, (पडते बिल्डिंग), तळवडे बाजारपेठत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयविकार, कॅन्सर ऑपरेशन, मेंदू व मणका ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मूतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन यांच्याशी संबंधित रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. नाव नोंदणीसाठी डॉ. कौरी, ओंकार पडते, संजय तानवडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com