रत्नागिरी- बालवाचकांसाठी नवनवीन पुस्तके दाखल

रत्नागिरी- बालवाचकांसाठी नवनवीन पुस्तके दाखल

rat10p25.jpg-
70270
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय
-----------
जिल्हा नगर वाचनालयात बालवाचकांसाठी पर्वणी
नवनवीन पुस्तके दाखल; विविध विषयावरील पुस्तके
रत्नागिरी, ता. १० : हल्ली मुले सतत मोबाईल गेम खेळतात, किंवा व्हिडिओ, रिल्स जास्त पाहतात. त्यातून मुलांचे शांत रहाणे एवढाच फायदा दिसतो. मात्र त्यामागे दडलेले तोटे मात्र निदर्शनास येत नाहीत. मुलांमध्ये वाढणारी चिडचिड, डोळ्यांवर परिणाम, सवंगड्यांबरोबरचा संवाद तुटणे तसेच संभाषण कलेचा अभाव हे फार उशिरा निदर्शनास येणारे आहेत. त्यामुळे मुलांच्या लहान वयातच मोबाईलपेक्षा पुस्तकांशी नाते जोडल्यास त्यांना त्याचा फायदाच होईल, याचा विचार घेऊन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने लहान मुलांची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. याचा जास्तीत जास्त बालवाचकांनी लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाने केले आहे.
रत्नागिरी जिल्हा नगर येथील मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. गेल्या वर्षी मुलांनी सुट्टीत वाचलेली पुस्तके व त्यातील कोणत्याही १० पुस्तकांचे परिक्षण अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात मुलांनी मोठ्या संख्येत आपला सहभाग नोंदवला होता. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मुलांसाठी वाचनालयात उपलब्ध असलेल्या स्वातंत्र्याशी संबंधीत पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या उपक्रमात शाळांनाही आपला सहभाग नोंदवला होता. पुस्तक प्रदर्शन पहात असताना मुलांनी ती पुस्तके हाताळावीत, वाचावीत यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली. वाचनानंतर मुलांशी संवाद असे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले होते. मुलांसाठी संबंधित विषयांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धेचे घेतली. त्याला मुलांचा भरभरुन प्रतिसाद लाभला.
यामध्ये रामायण, महाभारतातील कथा, टागोरांच्या गोष्टी यांसारख्या पुस्तकांबरोबरच गंमतीदार गोष्टी, जंगलातील गोष्टी तसेच खोडकर फुगा, मेघनची रंगीत दुनिया, मामाच्या गावाला, वाघाला व्हायचं होतं, मांजर, छोटा पक्षी ही पुस्तके मुलांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. मुलांसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या १०० रुपयांवरील खरेदीवर १० टक्के सवलत असून मुलांसाठी असलेल्या किमान १० पुस्तकांच्या खरेदीवर १५ टक्के सवलत ठेवली आहे. ही पुस्तके वाचनालयाच्या वेळेत वाचनालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती वाचनालयातून देण्यात आली.

कोट
मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा जागृततेने विचार करणारे, मुलांच्या बालपणापासूनच पुस्तकांची गट्टी व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेले पालक वाचनालयाने पाहिले. अगदी वाचू न लागलेल्या मुलांसाठीही चित्र व मोठी अक्षरे असलेली पुस्तके खरेदी करुन ते मुलांना वाचनाची गोडी लावताना दिसतात. ही मुले पुन्हा वाचनालयात आली की आपल्यासाठी असलेल्या पुस्तकांच्या रॅककडे धाव घेतात. तिथली पुस्तके हाताळतात-वाचतात. या लहानांना आपली वाचनाची आवड जोपासता यावी, यावर भर देत वाचनालयाच्या विक्री केंद्रात बालविभाग पुस्तकांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
- अॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com