दाभोळ-अखिल शिक्षक संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

दाभोळ-अखिल शिक्षक संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अखिल शिक्षक संघाचे
मुख्यमंत्र्यांना निवेदन
दाभोळ, ता. १० : अखिल शिक्षक संघाच्या प्रतिनिधींनी शनिवारी (ता. ९) मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून विविध मागण्यांबाबत ऊहापोह केला आहे.
पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शासन निर्णयानुसार नवीन शिक्षक भरतीपूर्वी जिल्हांतर्गत बदलीसाठी कार्यरत शिक्षकांपैकी जे शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत, अशा सर्व शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनानुसार रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. तसेच कार्यरत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना सोयीच्या जागी नियुक्ती मिळण्यासाठी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी कार्यमुक्त करण्यात यावे. नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी सदर शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया राबविण्याबाबत संबंधितांना आदेशीत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, तालुकाध्यक्ष विजय फंड, भालचंद्र घुले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com