भडकंब्यात ७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

भडकंब्यात ७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

७ कोटींच्या विकासकामांचे
भडकंब्यात भूमिपूजन
साखरपा, ता १० : नजीकच्या भडकंबा येथे ७ कोटी २९ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाट्न सोहळा खासदार विनायक राऊन आणि आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत झाला.
कोंडगाव तिठा ते भडकंबा श्रीदेव केदारलिंग ग्राममंदिरापर्यंत वाद्याच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिला मेळावा, महिला आरोग्य तपासणी, पथदीप, ग्रामदैवत केदालिंग मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे उदघाट्न करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कॅरमपटू आकांशा कदम, आरटीओ निखिल वेल्हाळ, बैलगाडा विजेता लाड आदींचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com