कसालात महिलादिनी
जनजागृतीपर रॅली

कसालात महिलादिनी जनजागृतीपर रॅली

70282
कसाल : गावराई नर्सिंग स्कूल व समुपदेशन केंद्र कुडाळ, वन स्टॉप सेंटर यांच्यातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली.

कसालमध्ये महिलादिनी जनजागृती रॅली

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० : गावराई नर्सिंग स्कूल व समुपदेशन केंद्र कुडाळ, वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर रॅलीचे आयोजन कसाल बसस्थानक येथे करण्यात आले. या रॅलीतून महिलांना विविध योजनांची माहिती पुरविण्यात आली. ब्रेस्ट कॅन्सर व सर्व्हिसल कॅन्सर यांच्या जनजागृतीसाठी पथनाट्य व नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे यांची उपस्थिती लाभली. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह बँकेने महिलांना बचतीसाठी प्राधान्य देण्याकरिता त्यांच्या योजनांची माहिती दिली. यावेळी वन स्टॉप सेंटरच्या प्रभारी केंद्र प्रशासक रुपाली प्रभू, समुपदेशन केंद्राचे समुपदेशक महेंद्र जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ व गावराई नर्सिंग कॉलेजचे प्रा. सिद्धरामन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com