बिघडले काजूचे अर्थकारण

बिघडले काजूचे अर्थकारण

बिग स्टोरी

rat१०p९.jpg
७०२३८
सुक्या काजू बिया
rat१०p१०.jpg
७०२४८
काजू बीसह बोंड.
rat१०p११.jpg
७०२४९
झाडाला लगडलेल्या ओल्या काजू.

rat१०p१५.jpg ः
७०२४६
काळ्या पडलेल्या काजूबिया
rat१०p१६.jpg ः
७०२४७
सह्याद्री शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली काजूसंबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्रित झालेले शेतकरी.
-------

इंट्रो

सातत्याने प्रतिकूल राहिलेले वातावरण, अवकाळी पाऊस, वाढते तापमान, रोग-कीडींचा प्रादुर्भाव आदी विविध कारणांमुळे नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असलेल्या काजूचे यावर्षी उत्पादन घटल्याचे चित्र आहे तर, दुसऱ्या बाजूला सुक्या काजू बी खरेदीच्या घसरलेल्या दराने काजू उत्पादन शेतकरी, बागायतदारांची चिंता वाढवली आहे. त्यातून, खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे आणि शेतकरी, बागायतदारांना हक्काचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या काजूचे अर्थकारण बिघडून गेले आहे. बिघडलेल्या या अर्थकारणातून सावरायचे कसे ? असा प्रश्‍न काजू शेतकरी, बागायतदारांना भेडसावू लागला आहे. त्यातून, प्रक्रिया उद्योग निर्मितीसह अन्य पिकांप्रमाणे काजूला शासनाकडून योग्य त्या हमीभावाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पुरवठा अधिक दर कमी, पुरवठा कमी दर अधिक या बाजाराच्या तत्त्वाला काजू उत्पादन व्यवसाय उतरलेला नाही कारण, उत्पादन कमी असतानाही दर कमी अशी बाजाराची स्थिती आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
---------

बिघडले काजूचे अर्थकारण

कोट्यवधीच्या उलाढालीवर परिणाम ; हमीभावाची अपेक्षा

ज्या वेळी उत्पादन जास्त असते त्या वेळी दर कमी आणि उत्पादन कमी असते त्या वेळी दरात वाढ होते, असे सर्वसाधारण आर्थिक गणित मांडले जाते. परंतु, यावर्षी काजूच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली असून सरासरी ४० ते ४५ टक्के उत्पादन आलेले आहे. अशा स्थितीमध्ये सुक्या काजू विक्रीला तुलनेने जादा दर मिळेल, असा आशावाद शेतकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहता गतवर्षीप्रमाणे यावर्षीही काजू बी खरेदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली दिसत आहे. त्यामुळे बिघडलेले अर्थकारण बागायतदारांना चक्रावून टाकणारे आहे.
....................

वाढती मशागत अन् व्यवस्थापन खर्च

सातत्याने राहणारे प्रतिकूल वातावरण त्यामध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, वाढते तापमान, किडींचा प्रादुर्भाव याची मिळणारी साथ आदींमुळे काजू पिकासाठी शेतकरी वा बागायतदारांना सातत्याने उपाययोजनांवर खर्च करावा लागतो. त्यामध्ये खतांची मात्रा, फवारणी यांसारख्या खर्चासह पुरेशा मनुष्यबळाअभावी येणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा समावेश आहे. याच्यातून, काजू पिकाच्या मशागतीसह व्यवस्थापनाचा कमालीचा खर्च वाढतो. त्या तुलनेमध्ये उत्पन्न खूप कमी मिळते. त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसविताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

..............

दरातील चढ-उतार

शेतीसह फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी फळबागा विकसित केल्या आहेत. त्याच्यातून जिल्ह्यातील दरवर्षी काजू लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढच होत चालली आहे. त्याच्यातून उत्पादित होणाऱ्या काजू बीला खर्च आणि सरासरी पन्नास टक्के नफ्याचा विचार करता सरासरी शेतकऱ्यांना प्रतिकिलो १७० ते १८० रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे; मात्र, सद्यःस्थितीमध्ये काजू बीचा भाव १२०-१२५ रुपये प्रतिकिलो दराभोवत घुटमळताना दिसत आहे. या दरामध्ये वाढ होणे अपेक्षित असताना मात्र, त्याच्यामध्ये घसरणच जास्त होताना दिसत आहे. कमी-जास्त होणाऱ्या दराने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी पेरल्याचे चित्र आहे.

.............

काजू आयातीचा प्रतिकूल परिणाम

विविध प्रक्रिया उद्योगांसाठी काजूगरांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. काजूवरील तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेले आयात कर आणि अन्य करांमुळे परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या काजूचा दर देशातील काजूच्या तुलनेमध्ये कमी असतो. त्यामुळे नफ्याचे गणित डोळ्यासमोर ठेवून प्रक्रिया उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून सिंगापूर, आफ्रिका, ब्राझिल, व्हिएतनाम आदी देशांमधून मोठ्या प्रमाणात काजू बी भारतामध्ये आयात केली जाते. याचा प्रतिकूल परिणाम देशी काजू बीच्या खरेदी दरावर होताना दिसत आहे.

...........
rat१०p१४.jpg ः
७०२४५
ओले काजूगर

ओल्या काजूगरांना जादा मागणी

सुक्या काजू बीच्या गेल्या काही वर्षामध्ये घसरलेल्या दराने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडून गेले आहे. अशा स्थितीमध्ये जादा मागणी आणि तुलनेने जादा असलेल्या ओल्या काजूगरांच्या विक्रीने शेतकऱ्यांना आर्थिक हात मिळवून दिला आहे. चविष्ट, रूचकर असलेल्या ओल्या काजूगरांना मुंबई-पुणे या मोठ्या शहरांसह दिल्ली, बेंगलोर आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ओल्या काजूगरांना पाचशेपासून थेट एक हजार ते बाराशे-पंधराशे रुपये प्रतिकिलो दराने विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षामध्ये सुक्या काजू बी विकण्याऐवजी शेतकऱ्यांनी ओले काजूगर काढून त्याची विक्री करण्यावर भर दिल्याचे चित्र दिसत आहे.

.....

असे आहे ओल्या काजुगराचे अर्थकारण

सुक्या काजू बीच्या एक किलोमध्ये सरासरी १८० ते २५० बियांचा समावेश असतो. गेल्या काही वर्षामध्ये सुक्या काजूबियांना मिळालेल्या प्रतिकिलो सरासरी दराचा विचार करता एका सुक्या काजू बीची किंमत सरासरी ५७-९०-१२० पैसे ठरताना दिसते. दुसऱ्या बाजूला ओल्या काजूंचा विचार करता साधारणतः २८० ते ३६० ओल्या काजू बी फोडल्यानंतर त्याच्यातून एक किलो एवढे ओले काजूगर मिळतात. ओल्या काजुगराला मागणीप्रमाणे मिळणार्‍या दराचा विचार करता एका काजुगराला सरासरी २ ते ४ रुपये भाव मिळताना दिसतो. तुलनात्मकदृष्ट्या विचार करता सुक्या काजू बियांच्या दराच्या तुलनेमध्ये ओल्या काजूगरांना मिळणारा दर जास्त दिसत आहे.


rat१०p१२.jpg, rat१०p१३.jpg
७०२५३, ७०२४४
गवारेड्याकडून काजूच्या झाडांची झालेली मोडतोड.

वन्यप्राण्यांकडून काजूचे नुकसान

सुकलेल्या काजू बिया झाडाचा बुंधा वा परिसरामध्ये जमिनीवर पडलेल्या असतात. रात्रीच्यावेळी मुक्त संचार करणार्‍या साळिंदरसारख्या प्राण्यांकडून या काजू बिया फोडून त्यातील काजूगर फस्त केला जातो. या द्वारे होणार्‍या नुकसानीचे प्रमाण वरकरणी हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिसत असले तरी त्याचा आर्थिक फटका शेतकरी, बागायतदार यांना सहन करावा लागतो. त्याचवेळी गवारेड्यांच्या कळपांकडूनही उभ्या असलेल्या काजूच्या झाडांची मोडूनतोडून नासधूस केली जाते. गेल्या काही वर्षामध्ये गवारेड्यांकडून होणाऱ्या या त्रासाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.
............

प्रक्रिया उद्योग शून्य

गेल्या काही वर्षामध्ये काजू लागवडीखालील आणि काजू उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. त्यातून, मोठ्या प्रमाणात काजू बोंडांची निर्मिती होत आहे; मात्र, काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग नसल्याने दरवर्षी हंगामामध्ये निर्माण होणारे लाखो टन काजूबोंड हे मातीमोल होत आहे. काजू बोंडावर प्रक्रिया करून विविध उत्पादनांची निर्मिती झाली असती तर रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीही साधता आली असती. त्याचवेळी कराच्या स्वरूपामध्ये शासनाच्या महसुलातही वाढ झाली असती. मात्र, त्या दृष्टीने सकारात्मक निर्णय वा विचार होताना दिसत नाही. मात्र, भविष्यात काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग उभारणीवर शासनाने भर द्यावा, अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.................
कमी मनुष्यबळाचा फटका

भातशेतीप्रमाणे काजू पिकालाही कमी मनुष्यबळाचा फटका बसत आहे. झाडांना पाणी-खते देणे, फवारणी करणे, काजू बी गोळा करणे, काजू बोंडापासून बी वेगळी करणे यांसह काजू पिकासंबंधित अन्य व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी शेतकरी वा बागायतदारांच्या अपेक्षेप्रमाणे पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्याचा त्याचा फटका बसत आहे. त्याच्यातून, व्यवस्थापन खर्चामध्ये वाढ होऊन खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसताना दिसत आहे. एकंदरित, भातशेती, आंबापिकासह काजू पिकालाही कमी मनुष्यबळाचा फटका बसताना दिसत आहे.
...........
चौकट
विविध मशिन निर्मितीवर संशोधन सुरू

लांजा येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर शेतीक्षेत्रातील विविध समस्यांवर मात करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणारे विविध प्रकारचे संशोधन करत आहे. त्याचवेळी शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग करत असून त्या अंतर्गत त्यांनी काजूची नवीन जातही विकसित केली आहे. काजू झाडांच्या खाली पडलेली आणि झाडावर सुकून लगडलेली काजू बी गोळा करण्यासह काजू बोंडापासून बी वेगळी करण्यासाठी कामगारांची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ मिळत नाही. काजू बोंडापासून बी वेगळी करण्यास उपयुक्त ठरणारी मशिनरी परदेशामध्ये विकसित करण्यात आलेली आहे. ती मशिनरी खरेदी करणे सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्याचवेळी ओल्या काजू बियांपासून सहजपणे काजूगर अलग करणारी अद्ययावत मशिन उपलब्ध नाही. मात्र, नव्या तंत्रज्ञानाची जोड देणारी तशा स्वरूपाची मशिनरी निर्मिती करण्याचे प्रयत्न अमर खामकर यांच्याकडून गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत. त्यामध्ये त्यांना यश आल्यास व्यवस्थापन खर्चावरील निम्मा भार कमी होण्याचा अंदाज खामकर यांनी वर्तवला आहे.
..................................................

दृष्टिक्षेपात काजूदर

काजू हंगामाला असलेला दरः १२०-१२५ रुपये
सध्या असलेला काजू बी दरः लहान बीः ११० रुपये, वेंगुर्ला काजू बीः १२०-१२५ रुपये
.............

चौकट

प्रतिकूल वातावरणाचा काजूला फटका

- मोहोर आणि फळधारणेचे प्रमाण घटले
- वाढत्या तापमानाचा काजू बीला चटका
- अवकाळी पाऊस, धुके-ढगाळ वातावरण
- भुरी करपासारख्या अन्य रोगांचा प्रादुर्भाव
- वातावरणामुळे मोहोर काळवंडला, गळती
- सरासरी ४०-४५ टक्के उत्पादन
..................

काजूवरील संकटाची ही आहेत कारणे

- प्रतिकूल हवामानामुळे व्यवस्थापन खर्चात दुपटीने वाढ
- खते, फवारणी खर्चात वाढ पण काजू बी दरात नाही
- पुरेशा मनुष्यबळाच्या अभावाचा फटका
- कमी असलेल्या आयात करामुळे परदेशी कजूचा दर कमी
- जादा दरामुळे स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजूला मोठी मागणी
- मोठ्या कंपन्या, व्यापाऱ्यांकडून कमी दराने काजू बी खरेदी
- अन्य पिकाप्रमाणे अपेक्षित असलेल्या हमीभावाचा अभाव
...............

काय आहेत काजू उत्पादकांच्या मागण्या....

- अन्य पिकांप्रमाणे काजूचा दरवर्षी हमीभाव निश्‍चित करावा
- आयात करण्यात येणाऱ्या परदेशी काजूवर करवाढ करावी
- आंब्याप्रमाणे काजूगराला जीआय पॅकिंगची सक्ती करावी
- घाऊक व्यापारी, मोठ्या कंपन्यांच्या मनमानीवर हवे नियंत्रण
- काजू बोंडावरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी
- काजू उद्योगाला उपयुक्त मशिनरी निर्मितीला चालना
- उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या जाती तयार कराव्यात

..........

दृष्टीक्षेपात रत्नागिरी जिल्हा

काजूचे एकूण क्षेत्र ः १ लाख १० हजार हेक्टर
काजूचे उत्पादन ः हेक्टरी ३ टन
सरासरी उलाढाल ः १५० कोटी
सरासरी काजू बोंड निर्मिती ः ६० टक्के
---------
-rat१०p१७.jpg ः
70233
विजय खांडेकर

कोट
प्रतिकूल आणि सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे फळधारणा न झाल्याने आधीच उत्पन्न निम्म्यावर आले आहे. त्यामध्ये मजुरी, खते, फवारणी यांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चामध्ये तिप्पट वाढ झाली आहे. त्या तुलनेमध्ये काजू बी खरेदीला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने अन्य पिकांप्रमाणे काजूचा हमीभाव निश्‍चित करावा. रोजगार निर्मिती करणाऱ्या छोट्या काजू प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याबाबत सकारात्मक विचार होऊन शासनाने धोरण निश्‍चित करावे.
- विजय खांडेकर, शेतकरी
---------
rat१०p२०.jpg
70236
अमर खामकर

कोट

प्रतिकूल वातावरणाचा फटका बसून आधीच उत्पादन घटलेले असताना मजुरी, खते यांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे उत्पादनखर्चही वाढला आहे. मात्र, त्या तुलनेमध्ये काजू बी खरेदीला योग्य भाव मिळत नाही. त्यातून, खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बिघडत चालला आहे. काजूच्या आयात करामध्ये झालेल्या कपातीचाही काजू बीच्या खरेदी दरावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे शासनाने काजूला हमीभाव देताना काजू शेतकरी, उत्पादक, प्रक्रिया उद्योजक यांना आर्थिक पाठबळ मिळेल, असा सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. त्याचवेळी काजू उद्योग वा शेतकर्‍यांना उपयुक्त ठरतील अशा कृषी विद्यापिठाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाच्या मशिनरींची निर्मिती होणे गरजेचे आहे.
- अमर खामकर, सह्याद्री शेतकरी संघटना, लांजा
--------
rat१०p१३.jpg
70234
डॉ. शैलेश शिंदेदेसाई

कोटो

ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, धुके या नैसर्गिक पर्यावरणीय बदलातून रसशोषक कीटकांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन काजू पिकावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये घट होते. मात्र, शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांचा अभ्यास करून योग्यवेळी योग्य प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करणे यांसारख्या उपाययोजना करताना सामूहिकरित्या एकात्मिक कीटकनियंत्रणाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून किडींचा प्रादुर्भाव रोखला जाऊन वा कमी होऊन पीक उत्पादन वाढीच्यादृष्टीने त्याचा उपयोग होईल.
- डॉ. शैलेश शिंदेदेसाई, काजू अभ्यासक
---------
rat१०p१९.jpg ः
70235
जयप्रकाश नारकर

कोट
काजू बीला उत्पादन खर्चापेक्षा तुलनेने कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्याचवेळी चार वर्षापूर्वी केंद्र शासनाने काजू बीच्या आयात करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. परदेशातून काजू बी आयात करण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा स्थानिक काजू बीच्या दरावर परिणाम होताना दिसत आहे. याचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.
- जयप्रकाश नारकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com