पाककृती स्पर्धेत प्रियांका नाईक प्रथम

पाककृती स्पर्धेत प्रियांका नाईक प्रथम

पान ५

पाककृती स्पर्धेत प्रियांका नाईक प्रथम
दाभोळ ः जेसीआय दापोली आयोजित रेज या विशेष उपक्रमांतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी दापोलीतील महिलांसाठी शेफ क्वीन २०२४ पाककृती स्पर्धा झाली. त्यामध्‍ये ३० महिलांनी सहभाग घेतला. उत्तम प्रकारच्या पंचतारांकित रेसिपी बनवून उपस्थितांची मने जिंकली. तसेच मँगो इन दापोली आणि निधी कलेक्शन पुरस्कृत यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रियांका नाईक, द्वितीय अनिता जैन, तृतीय लता दाबके आणि उत्तेजनार्थ वृषाली कदम आणि मुक्ता दाबके यांना मिळाले. स्पर्धेचे परीक्षण द फर्न समाली रिझल्टचे मुख्य शेफ मनोज कुमार यांनी केले. स्पर्धेसाठी निधी कलेक्शनच्या कविता मालू यांनी विशेष सहकार्य केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जेसी प्रियांका बापट, कार्यक्रम प्रमुख जेसी आदिती गोंदकर व इतर सर्व जेसीआय दापोलीच्या महिलांनी विशेष मेहनत घेतली.

वाकवलीत समरसता प्रतिष्ठानची बैठक
दाभोळ : पद्मश्री भि. रा. तथा दादा इदाते समरसता प्रतिष्ठान मंडळाची सभा वाकवली नवानगर येथील संस्था कार्यालयात प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष क्षीरसागर यांचे अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत स्पर्धा परीक्षा पुस्तक प्रदर्शन व मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, सभासद नोंदणी आदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. हे कार्यक्रम समरसता प्रतिष्ठान व सरोदे समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने करावे, असे निश्चित करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा जाणीव, जागृती व्हावी यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे कार्यवाह सदानंद रसाळ यांनी सांगितले.

दापोलीत ६ हजार ९४७ बालकांना लसीकरण
दाभोळ : दापोली तालुक्यातील ८ हजार ४३३ बालकांपैकी ६ हजार ९४७ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचा डोस दिला जाणार आहे. ० ते ५ वयोगटांतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचा प्रारंभ गावातील प्रत्येक केंद्रांवर करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र व दापोली उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ८ हजार ४३३ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. यातील ६ हजार ९४७ बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com