लांजा-कोटमधील कातळशिल्प संरक्षित व्हावे

लांजा-कोटमधील कातळशिल्प संरक्षित व्हावे

rat10p32.jpg
70319
लांजाः कोट येथील कातळशिल्प.
---------
कोटमधील कातळशिल्प संरक्षित व्हावे
आबा सुर्वे ; शासनाने मोबदला देऊन जागा ताब्यात घ्यावी
लांजा, ता. १०ः कोट-पाष्टेवाडी येथे कातळशिल्पे आढळली आहेत. मात्र ही जागा खासगी मालकीची असून त्याकडे जाण्यासाठी रस्ता नाही. तसेच त्यावर जनावरांचा वावर असतो. त्यामुळे ही कातळशिल्पे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने जमीन मालकाला योग्य मोबदला देऊन ही जागा ताब्यात घेऊन कातळशिल्प संरक्षित करावी, अशी मागणी कोटचे माजी सरपंच आबा सुर्वे यांनी केली आहे.
कोट-पाष्टेवाडी येथील माळरानावर पांडवकालीन पुरातन कातळशिल्पे आहेत. इतिहास संशोधकासाठी तसेच पर्यटनदृष्टया ही कातळशिल्पे अत्यंत महत्वपूर्ण आहेत. सद्यस्थितीत कातळशिल्पे असलेली जागा खासगी मालकीची आहे. तसेच या कातलशिल्पाकडे जाण्यासाठी सुस्थितीत रस्ताही नाही. या जागेच्या अवतीभवती लगतच्या जमीनमालकांची शेती आहे. त्यामुळे या जागेवर शेतीची कामे केली जातात. तसेच ही कातळशिल्पे उघड्यावर असल्याने पाळीव जनावरे, भटक्या जनावरांचा वावर असतो. त्यामुळे ही कातळशिल्पे भविष्यात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शासनाने या जमिनीचा योग्य मोबदला जागा मालकांना देऊन ती जागा शासनाने ताब्यात घ्यावी. तसेच तिथे जाण्यासाठी आवश्यक रस्ता व अन्य सुविधा उपलब्ध केल्यास ही कातळशिल्पे इतिहास संशोधकांसाठी महत्वपूर्ण ठरणार असून पर्यटनदृष्टयाही महत्वपूर्ण ठरतील, असे सुर्वे यांनी म्हटले आहे.
कोट गावाला ऐतिहासिक वारसा असून झाशीची राणी यांचे सासर कोट येथे आहे. तालुक्यातील कोलधे येथील तांबे कुटुंब हे राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असून कोट येथील नेवाळकर कुटुंब हे सासर आहे. तत्कालीन परिस्थितीत नेवाळकर कुटुंब झाशी येथे वतनावर गेल्याने त्या झाशीच्या रहिवासी झाल्या. त्यामुळेच राणी लक्ष्मीबाई यांचे भव्य स्मारक कोट येथे उभारण्याच्या हालचाली कोट ग्रामस्थांतर्फे सुरू आहेत. त्यामुळेच ऐतिहासिक कोट गावामध्ये असलेल्या या कातळशिल्पाची शासनाच्या वतीने जोपासना करून पर्यंटनदृष्टया विकसित करण्याची मागणी आबा सुर्वे यांनी शासनाकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com