न्हावेलीतील धोकादायक
वळणावर बर्हिवक्र आरसा

न्हावेलीतील धोकादायक वळणावर बर्हिवक्र आरसा

70355
न्हावेली : माउली मंदिराजवळील तीव्र वळणावर बर्हिवक्र आरसा बसविण्यात आला.

न्हावेली येथील धोकादायक
वळणावर बर्हिवक्र आरसा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : न्हावेली माउली मंदिराजवळील तीव्र वळणावर अपघाताची शक्यता ओळखून एमजीआर ग्रुप न्हावेली-देऊळवाडी यांनी बर्हिवक्र आरसा (कॉन्व्हॅक्स मिरर) बसवला. त्याचे लोकार्पण न्हावेलीचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर आणि उपसरपंच संतोष नाईक आणि ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
न्हावेली माउली मंदिराकडे जाताना असलेल्या वळणावर अपघाताची शक्यता जाणवत होती. हीच शक्यता ओळखून एमजीआर ग्रुपने आरसा बसवून अपघात टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी ग्रामस्थ दादा परब, गितेश परब, सगुण नाईक, अजय नाईक, शुभम नाईक, विघ्नेश नाईक, प्रथम धाउसकर, उदय परब, सुशील नाईक, विठ्ठल नाईक, प्रीतेश परब, सिद्धेश धवन, सगुण चव्हाण, रुपेश नाईक, नारायणा परब, कानिष नाईक तसेच ग्रामस्थ एकनाथ परब, बाळू सावळ, गणेश नाईक, आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com