Konkan Agricultural University
Konkan Agricultural Universityesakal

शेतकऱ्याची कमाल! राजापुरातील मुंडगा, सर्वट भातबियाणाला पेटंट; 50 वर्षांपासून करताहेत पिकाचा वापर

चौगुले हे भातशेतीमध्ये गेली अनेक वर्ष नवनवीन प्रयोग करत आहेत.
Summary

मुंडगा आणि सर्वट या भातबियाण्यांचे सुमारे ५० वर्षापासून म्हणजे आजोबांच्या अगोदरपासून आपल्या शेतामध्ये पीक घेतले जात आहे.

राजापूर : गेल्या काही वर्षामध्ये सुधारित वा संकरित जातीच्या भातबियाण्यांच्या शेतकऱ्‍यांच्या (Farmers) वाढलेल्या वापरामुळे पारंपरिक भातबियाणी (Rice Seeds) हद्दपार होऊ लागली आहेत. अशापैकी एक असलेली आणि सुमारे ५० वर्षापूर्वीपासून वापरात असलेली मुंडगा आणि सर्वट या गावठी भातबियाण्यांचे तालुक्यातील खरवते येथील प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी संवर्धन केले आहे.

कृषी विभाग आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून (Konkan Agricultural University) यावर सुमारे ७ वर्ष सखोल अभ्यास अन् संशोधन करून चौगुले यांना या दोन्ही भातबियाण्यांचे पेटंट देऊन गौरव केला आहे. एकाचवेळी दोन भातबियाण्यांचे पेटंट मिळवणारे चौगुले हे जिल्ह्यातील बहुतांश पहिले शेतकरी ठरले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भावे यांनी नुकतेच चौगुले यांचा भातबियाण्यांच्या पेटंटचे प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

Konkan Agricultural University
Ambabai Temple : अंबाबाई मंदिराचा सुधारित 1447 कोटींचा आराखडा मंजूर; पालकमंत्री मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक

चौगुले हे भातशेतीमध्ये गेली अनेक वर्ष नवनवीन प्रयोग करत आहेत. भातशेतीतील या योगदानाची दखल घेऊन कृषी विभागातर्फे त्यांना तीन वर्ष प्रगतशील शेतकरी, आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. विविध कारणांमुळे भातशेतीकडील शेतकऱ्‍यांचा कल कमी होत चाललेला असताना एकाचवेळी दोन भातबियाण्यांचे मिळालेले पेटंट भातशेतीसह कृषिक्षेत्रासाठी नवसंजीवनी म्हणावी लागेल.

Konkan Agricultural University
Sahyadri Tiger Project : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने पर्यटन व्यवसायात संधी; सातारा, सांगली, कोल्हापूरसह रत्नागिरीत विस्तारला प्रकल्प

मुंडगा, सर्वटमध्ये अधिक पोषणमुल्य

केंद्र शासनाचा कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाकडून मुंडगा आणि सर्वट जातीच्या भाताचा सात वर्ष अभ्यास केल्याची माहिती प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी दिली. अधिकारी, संशोधक भाताची लावणी आणि कापणीच्या कालावधीमध्ये शेतामध्ये येऊन दोन्ही जातीच्या भाताची पाहणी करून नोंदी केल्या. त्यामध्ये भाताच्या लोंबीचे प्रमाण, दाण्यांचे प्रमाण, भाताच्या गवताची उंची, फुटवे आणि भाताचा कालावधी आदी मुद्द्यांचा समावेश आहे. संकरित भातबियाण्यांच्या तुलनेमध्ये मुंडगा आणि सर्वट जातीच्या भातबियाण्यांमध्ये अधिक पोषणमुल्य असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

Konkan Agricultural University
Gautam Adani : अदानींच्या 'त्या' प्रकल्पाला तारळे खोऱ्यातील नागरिकांचा कडाडून विरोध; काय आहे प्रकल्प, का होतोय विरोध?

मुंडगा आणि सर्वट या भातबियाण्यांचे सुमारे ५० वर्षापासून म्हणजे आजोबांच्या अगोदरपासून आपल्या शेतामध्ये पीक घेतले जात आहे. या दोन्ही भातबियाण्यांचे शासनासह कृषी विद्यापीठाकडून पेटंट मिळाल्याचा अधिक आनंद झाला आहे. ही भातबियाणी अधिकाधिक शेतकऱ्‍यांकडे पोहचवून त्याची लागवड वाढवण्याच्यादृष्टीने भविष्यात प्रयत्न करणार आहे. या भात संवर्धन आणि संशोधनामध्ये आर. सी. अग्रवाल, दीपलरॉय चौधरी, कुलगुरू डॉ. संजय भावे, प्रा. विजय दळवी, प्रा. पराग हळदणकर, शोएब सावरटकर, प्रसाद बिर्जे, दीपक पवार, जिल्हा कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, आत्मा विभागाचे वैभव अमरे आदींचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले.

-दयानंद चौगुले, पेटंट मिळालेले शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com