Konkan Shimgotsav
Konkan Shimgotsavesakal

Konkan Shimgotsav : ऐन 'शिमग्यात' वाऱ्यामुळे मासेमारीवर 'संक्रांत'; मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले

गेल्या आठवड्यात मासेच गायब झाल्यामुळे दरही गगनाला भिडले आहेत.
Summary

सध्या वेगवान वाऱ्यांमुळे माशांचे स्थलांतर आदी कारणांमुळे स्थानिक मच्छीमारी नौकांना मासळी मिळत नाही.

रत्नागिरी : ऐन शिमग्यात (Konkan Shimgotsav) मासेमारीवर ‘संक्रांत’ आली असून, दोन महिन्यांपासून मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. गेल्या आठवड्यात मासेच गायब झाल्यामुळे दरही गगनाला भिडले आहेत. रोजच्या खर्चाएवढीही मासळी मिळत नसल्याने नौकामालक अडचणीत सापडले आहेत. या आठवड्यात केवळ ४० ते ५० हजार रुपयांचीच मासळी मिळाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. वेगवान वाऱ्यांमुळे मासेच मिळत नसल्याने नौका बंदरातच उभ्या आहेत.

जिल्ह्यात २ हजार ५२० मासेमारी (Fishing) नौका असून, त्यातील २ हजार ७४ यांत्रिकी नौका आहेत. २७५ पर्ससीन नेट मच्छीमार नौका आहेत. सुमारे ८० ते ९० टक्के नौका मालकांवर मासळीअभावी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

Konkan Shimgotsav
राजू शेट्टींचं टेन्शन वाढवणारी बातमी! हातकणंगलेबाबत जयंत पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, तर आम्हालाही..

सध्या वेगवान वाऱ्यांमुळे माशांचे स्थलांतर आदी कारणांमुळे स्थानिक मच्छीमारी नौकांना मासळी मिळत नाही. किरकोळ मासळी मिळत असल्याने त्याचे दर वधारलेले आहेत. त्यातही सर्वांच्या आवडीचा पापलेट दुर्मिळच झाला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून मासा मिळत नाही. परराज्यातील मच्छीमारांचे अतिक्रमणही मासळीच्या तुटवड्याला कारणीभूत असल्याचे काहींचे मत आहे.

मागील खर्च नौका मालकांवर

पर्ससीन नेट नौकांना आठवडाभर मासेमारी करायची झाली तर इंधन, पगार व खलाशांचा इतर किराणा माल आणि आठवड्याच्या पगाराची रक्कम धरून ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो; परंतु या आठवडाभरात केवळ ४० ते ५० हजार रुपयांचीच मासळी मिळत आहे. परिणामी, गेल्या पंधरा दिवसांपासून नौका बंदरातच उभ्या आहेत. मागील खर्च नौका मालकांच्या अंगावर पडला आहे.

Konkan Shimgotsav
'शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा अदानी ग्रुपचा वीज प्रकल्‍प रद्द करा'; प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

पापलेट गायब, मासळीचे दर दुप्पट

मिरकरवाडा बंदरावर दोन महिन्यांपूर्वी ३५० ते ४५० रुपये किलोने मिळणाऱ्‍या सुरमईचा दर रविवारी ९०० रुपये प्रतिकिलो होता. सरंगा ३०० रुपये किलो दराने मिळत होता तो ७०० रुपये किलो दराने विकला जात होता. सौंदाळा १०० रुपये किलो दराने मिळत होता त्याचे दर २८० रुपये किलो आहेत. बांगडा ८० ते ९० रुपये होता तो रविवारी १३० रुपये किलो दराने होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com