Business
Businessesakal

'उद्योजक' अष्टावधानी, अष्टपैलू असेल तर त्याला उद्योजकतेचं कोणतंही आवाहन प्रेमानं, संयमानं, दूरदृष्टीनं हाताळता येत!

उद्योग हा बुद्धिमत्ता (Intelligence), नीतिमत्ता, गुणवत्ता या प्रमुख घटकांच्या आधारे मार्गी लागत असतो.
Summary

व्यवसायाला अतिशय नैतिक आणि कायदेशीर बनवण्यात व्यावसायिक नैतिकता महत्वाची भूमिका बजावते.

-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com

उद्योग (Business) सुरू करण्यापूर्वी, उद्योग सुरू करत असताना, उद्योग विस्तारताना उद्योजकाला काही लिखित-अलिखित मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून उद्योजकीय मार्गक्रमण करावे लागते. या उद्योगयात्रेत उद्योगाला अर्थ निर्माण करून देण्यासाठी उद्योजकाला विविध धोरणात्मक, वर्तनात्मक, गुणात्मक बदल स्वीकारावे लागतात.

उद्योग हा बुद्धिमत्ता (Intelligence), नीतिमत्ता, गुणवत्ता या प्रमुख घटकांच्या आधारे मार्गी लागत असतो. साम, दाम, दंड, भेद या सगळ्यांचा वापर उद्योजकाला आपल्या उद्योगनीतीत करावाच लागतो. उद्योजक हा अष्टावधानी व अष्टपैलू असेल तर त्याला उद्योजकतेचे कोणतेही आवाहन प्रेमाने, संयमाने, दूरदृष्टीने हाताळता येते. स्पर्धात्मक युगात उद्योजकाने युद्धनीतीप्रमाणे विचार करून धोरण अवलंबल्यास बाजारपेठेतील स्थान अधिक मजबूत करणे सोपे होते. प्रेम आणि युद्धात सर्व काही माफ असते, या आशयाचे वाक्य सर्वांनी ऐकलेले असेलच.

Business
Business : कोणताही 'उद्योग' घाईघाईने नाही तर संयमाने, सातत्याने करायचा असतो; यासाठी काय करावं लागेल?

याचाच अन्वयार्थ असा होतो की, उद्दिष्ट जर प्रामाणिक असेल तर प्रेम आणि युद्धात सर्व काही न्याय्य आहे; पण दुसऱ्या बाजूने विचार करता असे लक्षात येते की, काय न्याय्य, काय न्याय्य नाही, काय योग्य-अयोग्य, काय नीती संमत, काय शाश्वत, काय अशाश्वत, काय बरोबर, काय चूक, काय विधी संमत, काय उचित-अनुचित, काय पूर्ण-अपूर्ण, काय आवश्यक-अनावश्यक? हे ठरवणार कोण तर आपणच ना.. म्हणजे या सगळ्या गोष्टी ठरवायच्या तर उद्योजकांकडे नीतिमत्ता, बुद्धिमत्ता व तारतम्यता व निर्णयक्षमता ही असायलाच हवी कारण, उद्योगात प्रेमाने ग्राहक मिळवायचे असतात तर मैत्रीपूर्ण निरोगी स्पर्धा करून स्पर्धकाला नैतिक मार्गांचा अवलंब करून हरवायचे असते.

थोडक्यात काय नीतिमत्तेच्या जोरावर प्रेमपूर्वक जिंकायचे युद्ध म्हणजे उद्योग असेही म्हणता येईल. नीतिशास्त्र हेच विजयी होण्याचे महत्त्वाचे तंत्र आहे जो नीती आणि न्याय्य घटकांच्या बाजूंनी असतो तो निश्चितच विजयी होऊ शकतो. नीतिमूल्य, नैतिकता यांच्या बळावर उद्योजक दीर्घकाळासाठी आपले उद्योजकीय वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. स्पर्धात्मक युगात उद्योजकतेचे महत्त्वाचे अस्त्र हे नीतिशास्त्रच ठरत आहे. रणनीती, युद्धनीती, अर्थनीती, राजनीती, इसापनिती, उद्योगनीती कौटिल्यनीती, चाणक्यनीती, परराष्ट्रनिती, निती आयोग असे विविध शब्द आपल्या वाचनात येत असतात; पण नीती म्हणजे नेमकं काय, हाच मूलभूत प्रश्न आपणास पडत असतो.

Business
Frozen Shoulder Symptoms : फ्रोझन शोल्डरपासून मिळवा मुक्ती, फिजिओथेरपीमुळे पुनश्‍च येई शक्ती।

चाणक्य प्रगल्भ बुद्धीचा द्रष्टा विचारवंत होता. त्याने हुशारीने काही गोष्टी सांगितल्या ज्या त्या काळात विजयी होण्याची शक्यता वाढवणाऱ्या ठरल्या. इसापनितीच्या छोट्या उपदेशपर बोधकथा जीवनकौशल्य समजावून देणाऱ्या ठरल्या. योग्यवेळी योग्य ठिकाणी केलेली किंवा करावयाची योग्य कृती म्हणजे नीती असे म्हणता येईल. नीती म्हणजे धोरणात्मक कृती जी काल संमत व लोक संमत असेल व ती आपल्या अंतिम उद्देशांना पूर्णत्वास नेणारी असेल. वचनबद्धता, नीतीमूल्यांविषयी असलेली निष्ठा, कायद्याचा आदर आपल्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन प्रामाणिकपणे आपले काम न्याय्य मार्गाने इतर उद्योजकांचा मान व आदर राखत जबाबदारीने पूर्णत्वास नेणे हे अत्यंत महत्त्वाचे नीतीशास्त्र ठरते.

नैतिक अधिष्ठान, व्यवहार्यप्रणाली, लवचिक; पण सकारात्मक धोरण, योग्य उद्योजकीय सिद्धांत व आदर्श उद्योजकीय आचारसंहिता उद्योजकाला उद्योग साकारताना किंवा निर्णयप्रक्रियेत हितकर ठरत असतात. उद्योग गतिमान होण्यासाठी नियम, नियमावली, मिमांसा, विश्लेषण, कूटनीती, चिकित्सापद्धतीचा अवलंब नीतिकार, सल्लागार करतात. उद्योजकांना उद्योग सुरळीत व यशस्वीपणे करण्यासाठी आवश्यक असणारी नीती तसेच त्यांना कार्यप्रवण राहण्यासाठी लागणारी प्रेरणा व गतीनीतिज्ज्ञ देत असतात. ते उद्योजकांना व्यवसाय, धंद्याच्या धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतात. कधी कधी उद्योजक हे स्वतः नीतिकार किंवा नीतीज्ज्ञही असू शकतात.

Business
Black Panther : कोकणात काळ्या बिबट्याचा मुक्त वावर; राजापूर, गुहागरात आढळला 'ब्लॅक पँथर'

व्यवसायाला अतिशय नैतिक आणि कायदेशीर बनवण्यात व्यावसायिक नैतिकता महत्वाची भूमिका बजावते. उद्योजकाचे नैतिक वर्तन, त्याचे पारदर्शी व्यक्तिमत्त्व उद्योगाला विशेष अशी अतिरिक्त ओळख मिळवून देऊ शकते. ज्यांची नैतिकमूल्ये, सद्गुण उच्च आणि अस्सल आहेत अशा उद्योगपतींसाठी उद्योग धोरण प्रणाली अंतिम करणे हे सोपे होऊन जाते. कारण, त्यांनी स्वीकारलेली नीती ही सर्वसमावेशक, सकारात्मक स्वरूपाची असू शकते. जीवनमूल्ये, वर्तणूक नमुने, धोरणे हे सर्व घटक नेहमीच भागधारकांना उद्योजक प्रक्रियेत आकर्षित करून घेण्यासाठी साहाय्यभूत ठरत असतात. योग्य व्यूहरचना व अचूक तयार केलेली उद्योगनीती उद्योगाला निश्चित गती प्राप्त करून देते.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com