कुडाळात ठाकरे गट बैठकीत 
महिला पदाधिकाऱ्यांची निवड

कुडाळात ठाकरे गट बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांची निवड

74817
कुडाळ ः शहर बैठकीत विविध महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.


कुडाळात ठाकरे गट बैठकीत
महिला पदाधिकाऱ्यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः कुडाळ शिवसेना शहर संघटक सौ. श्रेया गवंडे, उपशहरप्रमुख सौ. रोहिणी पाटील, सौ. दुर्वा गवाणकर यांची निवड शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते सौ. जान्हवी सावंत यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
कुडाळ शिवसेना (उबाठा) शहर बैठक नुकतीच सिद्धिविनायक सभागृहात खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी श्री. राऊत म्हणाले, ‘‘शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शहरात संघटनेचे चांगले काम सुरू आहे. महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या माध्यमातूनही अतिशय चांगले काम सुरू असून त्याचीच पोहोचपावती म्हणून आजची ही उपस्थिती आहे. उपनगराध्यक्ष किरण शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटनेचे काम अगदी जोमाने सुरू आहे. येथील मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह, कुडाळ एसटी बसस्थानक, भंगसाळ बंधारा आणि शहरातील विकासकामे ही ठळक कामे आहेत.’’ यावेळी आमदार नाईक, शिवसेना नेते अतुल बंगे, श्री. शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका सौ. ज्योती जळवी, नगरसेविका सई काळप, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख सौ. मेघा सुकी, कुडाळ तालुका शिवसेना तालुका संघटक सौ. दळवी, सौ. अर्चना तायशेटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com