Kokan Crime News
Kokan Crime Newssakal

Kokan Crime News: पोलिसांकडून मच्छीमारांचा छळ? वाचा नेमक काय आहे प्रकरण

मच्छीमार समाजावर होणारा अन्याय भाजप पक्ष कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही |The BJP party will not tolerate injustice to the fishing community under any circumstances

Malvan News: व्हेल माशाच्या उलटी संदर्भात तपासाच्या नावाखाली मच्छीमारांचा पोलिसांकडून नाहक छळ केला जात असून तो त्वरित थांबवा. मच्छीमार समाजावर होणारा अन्याय भाजप पक्ष कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही.

कुडाळ येथे होणाऱ्या बैठकीत या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या विषयात लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली.

Kokan Crime News
Crime News: चार वर्षांच्या मुलासह बेपत्ता झालेल्या महिला सापडली युपीमध्ये; पोलिसांना आले यश

तोरसकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, दोन आठवड्यांपूर्वी व्हेल माशाच्या तस्करी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार संशयितांना सांगली-मिरज पोलिसांनी अटक केली होती. यावेळी १९ कोटी रुपयांची १९ किलो उलटी संशयितांकडून जप्त करण्यात आली, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला.

किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयितांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनविली आहे, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलिस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. तपासा दरम्यान काही मच्छीमारांना मारहाण केल्याचे वृत्त हाती आली आहे.

Kokan Crime News
Crime News: चार वर्षांच्या मुलासह बेपत्ता झालेल्या महिला सापडली युपीमध्ये; पोलिसांना आले यश

संबंधित विषयात पोलिस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे काही मच्छीमार कुटुंब अटकेच्या भीतीने परागंदा झाली आहेत. आज त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.’’
---
अन्याय खपवून घेणार नाही
मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल सिंधुदुर्ग जिल्हा भाजप, मच्छीमार सेलने घेतली असून येथील बैठकीत या विषयात पालकमंत्री चव्हाण आणि केंद्रीय मंत्री राणे यांच्याकडे या विषयात लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे. मच्छिमार समाजावर होणारा अन्याय भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नसल्याचा इशाराही श्री. तोरसकर यांनी दिला आहे.

Kokan Crime News
Jalgaon Crime News : रेल्वे ‘आरपीएफ’वर हल्ला; 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com