भाजपाचे राज्यभर बूथ विजय अभियान सुरू

भाजपाचे राज्यभर बूथ विजय अभियान सुरू

५० (पान ३ साठी)


-rat३p२६.jpg-
२४M७५०८७
रत्नागिरी : भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना समीर गुरव. डावीकडून राजन फाळके, सतेज नलावडे, उमेश कुळकर्णी, अभिजित पेडणेकर, मंदार खंडकर.
----------

भाजपचे बूथ विजय अभियान सुरू

समीर गुरव ; प्रत्येक बूथवर मते वाढवण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : भाजपतर्फे राज्यभर ३ एप्रिलपासून सहा दिवस बूथ विजय अभियान राबवण्यात येत आहे, अशी माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते व प्रदेश कायकारिणी सदस्य समीर गुरव यांनी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या द्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.
बूथ विजय अभियानांतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य असून प्रत्येक बूथवर या सहा दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, लाभार्थींशी नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाच झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवावर्ग, महिला असे समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील. बूथपासून दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे समीर गुरव यांनी सांगितले.
बूथ समिती, प्रमुखांची नियुक्ती, १००हून अधिक जणांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघात बूथ कार्यकर्ते व पन्ना प्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार आहे. संमेलनाला उपस्थित प्रत्येक बूथ अध्यक्षाला त्या त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा, मागच्या ३ निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी व आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. संमेलनामध्ये बूथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित कार्यावर व जबाबदारीबाबत विस्तृत चर्चाही होतील, असे गुरव यांनी सांगितले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, शहराध्यक्ष राजन फाळके, प्रसिद्धीप्रमुख उमेश कुळकर्णी, कोकण विभाग समन्वयक अभिजित पेडणेकर, सरचिटणीस मंदार खंडकर आदी उपस्थित होते.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com