कबड्डी स्पर्धेत ''मानसीश्वर वेंगुर्ले'' विजेता

कबड्डी स्पर्धेत ''मानसीश्वर वेंगुर्ले'' विजेता

swt317.jpg
75140
डांगमोडेः निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धेतील विजेता जय गणेश मालवण महिला कबड्डी संघ. (छायाचित्रः शैलेश मसूरकर, मसुरे)

कबड्डी स्पर्धेत ‘मानसीश्वर वेंगुर्ले’ विजेता
मसुरेतील जिल्हास्तर स्पर्धाः महिलांमध्ये ‘जय गणेश मालवण’चे यश
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. ३ः मसुरे-डांगमोडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ, डांगमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या गटात जय मानसीश्वर वेंगुर्ले संघाने शिवदैवत नेरुर-कुडाळ संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला निमंत्रित कबड्डी स्पर्धेत जय गणेश मालवण संघाने शुभम देवगड संघाचा पराभव करून विजेता ठरला.
पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण १० संघांनी सहभाग दर्शविला. स्पर्धेत पुरुषांच्या गटात तिसरा क्रमांक गिरोबा सांगेली कबड्डी संघ व चतुर्थ क्रमांक रेवतळे मालवण कबड्डी संघाने पटकावला. विजेत्या संघाला रोख ५०००, उपविजेत्या संघाला रोख ३००० रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी दीड हजार रुपये आणि (कै.) शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात आले. या स्पर्धेमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून भक्ती साळगावकर, उत्कृष्ट पकड अक्षय चव्हाण, उत्कृष्ट चढाई ओमकार साहिलकर यांची निवड करण्यात आली. या सर्वांना रोख रक्कम आणि स्मृती चषक प्रदान करण्यात आले. स्पर्धेसाठी पंच तुषार साळगावकर, सी. ए. नाईक, जयेश परब, हेमंत गावडे, अमित गंगावणे, पंकज राणे, श्री. साळुंखे, शैलेश नाईक, नितीन हडकर, प्रथमेश नाईक यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण प्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती छोटू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, बिळवस सरपंच मानसी पालव, आंगणेवाडी विकास मंडळाचे कार्यवाह छोटू आंगणे, काका आंगणे, बाबू आंगणे, गायत्री ठाकूर, प्रफुल्ल देसाई, बाळप्रकाश ठाकूर, राजा ठाकूर, महेश ठाकूर, सोमा ठाकूर, हरी ठाकूर, परशुराम चव्हाण, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, कमलेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, प्रकाश ठाकूर, रमेश ठाकूर, मंगेश ठाकूर, कल्पना ठाकूर, परेश ठाकूर, बापू ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, कृष्णा ठाकूर, गार्गी चव्हाण, अनिल ठाकूर, पूजा ठाकूर, पंकज ठाकूर, मंगेश चव्हाण, परशुराम ठाकूर, बाबू ठाकूर, अनिल ठाकूर, अमित ठाकूर, संचित ठाकूर, विकास ठाकूर, संकेत ठाकूर, परशुराम चव्हाण उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळा गोसावी, सरोज परब, विजय केनवडेकर, नगरसेवक दीपक पाटकर, वेरली सरपंच धनंजय परब, बिळवस सरपंच मानसी पालव, गणेश कुशे, बाळा आंगणे, पुरुषोत्तम शिंगरे, जितेंद्र परब, गणेश आंगणे, अनंत भोगले, जगदीश चव्हाण, सचिन पाटकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश ठाकूर यांनी केले. आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com