खासदार दलवाईमुळे लोटे औद्योगिक वसाहत

खासदार दलवाईमुळे लोटे औद्योगिक वसाहत

निवडणूक पानासाठी - खासदारांच्या आठवणी

खासदार दलवाई यांच्यामुळेच
लोटे औद्योगिक वसाहत
- सतीश पाटणकर
माजी मंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई एकदा लोकसभेसाठी खासदार म्हणून तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून गेले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून लोटे येथील औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले होते. सर्वधर्म समभावाच्या माध्यमातून त्यांनी समाजवाद जोपासला आणि काँग्रेस विचारांशी ते एकनिष्ठ राहिले. ते चिपळूण शहरालगतच्या मिरजोळी गावचे मूळचे रहिवासी होते. त्यांचा जन्म व शिक्षण चिपळूणमध्ये, वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले हुसेन दलवाई चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असे सांगत व दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळयाचे नाते ठेवीत. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात ते कायदा, राजशिष्टाचार, बंदरे मंत्री होते. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जात होते. त्यांचा चिपळूणमध्ये १७ ऑगस्ट १९२२ ला जन्म झाला. अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे दलवाई हे पाहता क्षणी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल, असे व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्न चेहऱ्याने सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेत असत. ते कट्टर काँग्रेसवासी होते. मात्र, त्यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण, (कै.) वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका त्यांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत. शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत. त्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण यांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात दलवाई यांना मंत्री केले. त्यानंतर बॅ. अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले.
राज्यसभेवर ते खासदार म्हणून दोनवेळा निवडून गेले. काही काळासाठी त्यांनी अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तेथेही कार्यकर्त्यांची सदैव वर्दळ असे. त्याच सुमारास ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यरत झाले. रोज सकाळी तीन तास ते प्रतिष्ठानमध्ये काम करीत असत. लोटे येथे औद्यागिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
(लेखक मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com